मालपाणी रिसॉर्ट जळीत प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नाही
बंदी असलेल्या थर्माकोलच्या वापरामुळे आगीचा भडका
संगमनेर प्रतिनिधी दि. 7
संगमनेर मधील बहुचर्चित मालपाणी रिसॉर्ट जाळीत प्रकरणी अद्याप पर्यंत कोणावरही गुन्हा दाखल झाला नसून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती संगमनेर शहर पोलीस स्टेशन कडून मिळाली आहे. दरम्यान एका कार्यक्रमाचा सेट बनवताना बंदी असलेल्या थर्माकोल डिझाईनचा वापर केल्याने ही आग भडकली आणि एकाचा नाहक बळी गेला असे सांगितले जात आहे.

या जळीता मध्ये भाजल्याने एका कर्मचाऱ्यांचा मृत्यू देखील झाला आहे. मात्र ठेकेदार किंवा इतर कोणावरही अद्यापर्यंत कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीत. आग कशामुळे लागली हे कारण गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. आग कशी लागली, एवढा मोठा भडका असा काय उडाला याचा तपास पोलीस करत असून थेट रिसॉर्ट शेजारील शेतातील ऊस देखील या आगीने होरपळून निघाला होता. अद्याप पोलीस कुठल्याही निष्कर्षापर्यंत आले नसून या संदर्भात लवकरच गुन्हा दाखल होईल असे सांगण्यात येत आहे.

बंदी असलेल्या थर्माकोलचा वापर केल्याने आगीचा भडका
दरम्यान या रिसॉर्टमध्ये एका उद्योजक परिवाराच्या विवाह निमित्त असलेल्या रिसेप्शन साठी सेट बनवण्याचे काम चालू होते. या सेटवर ही आग लागली व काही क्षणातच हा सेट पूर्ण जळून खाक झाला. संबंधित ठेकेदाराने सेटची सजावट करताना बंदी असलेल्या थर्माकोलचा वापर केला होता. थर्माकोलचा वापर करण्यास बंदी असल्याने या ठिकाणी हा वापर कसा केला जात होता? असा असावा उपस्थित होत असून याबाबत सगळीकडे चर्चा असून थर्माकोल मुळेच आग भडकली आणि कोणाला काही कळण्याच्या आत तिने रौद्ररोग घेऊन एकाचा बळी घेतला असेही सांगितले जात आहे. पोलिसांचा तपास त्या दिशेने चालू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
