रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर डॉक्टरचा अत्याचार 

संगमनेर शहरातील घटना

संगमनेर प्रतिनिधी दि. 6

रुग्णालयात उपचारासाठी ऍडमिट असलेल्या अल्पवयीन मुलीच्या असाहाय्यतेचा फायदा घेत रुग्णालयाच्या मुख्य डॉक्टरने तिच्यावर बळजबरीने बलात्कार करण्याची घटना संगमनेर शहरातील प्रथितयश रुग्णालयात घडली असून या डॉक्टर विरोधात संतापाची लाट पसरली आहे. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव डॉक्टर अमोल कर्पे असून या अल्पवयीन मुलीवर रुग्णालयाच्या गच्चीवर अत्याचार करून तिला धमकीही देण्यात आली.

डॉक्टर कर्पे याचे हॉस्पिटल संगमनेरच्या मध्यवर्ती भागात असून दोन दिवसांपूर्वी एक कॉलेज मधील अल्पवयीन युवती ( वय 16 वर्ष ) कॉलेजमध्ये असताना चक्कर येण्याचा त्रास होत असल्याने डॉक्टर अमोल कर्पे याच्या रुग्णालयात उपचारा करिता ऍडमिट करण्यात आली होती. त्यानंतर आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास डॉक्टर करपे यांनी तिच्या रूम मध्ये जाऊन तुझी तब्येत कशी आहे असे विचारना केली. तेव्हा तिने मला बरे आहे असे सांगितले. त्यानंतर डॉक्टरने तिला बरोबर येण्यास सांगून रुग्णालयाच्या टेरेसवर नेले व त्या ठिकाणी तिच्याशी बळजबरी करत आणि तिला धमकावत बलात्कार केला असल्याचा जबाब संबंधित मुलीने दिला असून पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान आरोपी डॉक्टर अमोल कर्पे यांचे राजकीय वजन आणि आर्थिक ताकद पाहता पहाटे घडलेल्या घटनेचा गुन्हा कुशिराने दाखल करण्यात आला. त्यासाठी मुलीच्या पालकांना आणि नातेवाईकांना भर उन्हात पोलीस ठाण्यात चकरा माराव्या लागल्याचे सांगण्यात येते. गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पोलिसांवर राजकीय दबाव असल्याची चर्चाही यावेळी होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!