संगमनेरला श्रीराम नवमी उत्साहात !

आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सपत्नीक महाआरती

संगमनेर प्रतिनिधी दि. 6

संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौकात असणाऱ्या श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात आणि प्रभू श्रीरामचंद्रांचा जयघोष करत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या वेळी आमदार अमोल खताळ आणि निलम खताळ यांच्या हस्ते पूजा करून महाआरती करण्यात आली.

संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौकात असणाऱ्या श्रीराम मंदिरामध्ये रामनवमी निमित्त श्रीरामजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून या मंदिरात रामभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. आमदार खताळ यांच्या हस्ते सर्वप्रथम राम लक्ष्मण आणि सीता यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम यांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांची आरती करण्यात आली. आमदार खताळ यांनी संगमनेरकरांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या.

प्रभू रामचंद्र की जय, सिया वर रामचंद्र की जय असा जयघोष करत परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी रामजन्मो उत्सवाचा पाळणा महिलांनी हलविला. अनेक महिलांनी राम भक्तांनी ओव्या गाऊन राम जन्मोत्सवाचे स्वागत केले. भाजप शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, सुभाष कोथमीरे, राम मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कमलाकर भालेकर, योगराज परदेशी, अक्षय थोरात, अनिकेत चांगले, मुन्ना जोशी, राम वामन, विनायक तांबे, शुभम लहामगे, योगेश मांगलकर, वरद बागुल, शुभम डावखरे, गिरीश मेंद्रे, विलास परदेशी चेतन तारे, अजित खेंगले, तुषार गीते, यांच्यासह रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!