खतम-ए-कुरआन – हजरत कदर बादशाह कादरी मस्जिद
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 13
सांगमनेर – हजरत कदर बादशाह कादरी मस्जिदमध्ये दरवर्षी प्रमाणे १० दिवसांचा खतम-ए-कुरआन आयोजित करण्यात आला. यंदा या परंपरेला २५ वर्षे पूर्ण झाली. २००० साली सुरू झालेल्या या उपक्रमाची आज एक भक्कम परंपरा बनली आहे.

हा पवित्र उपक्रम दिवंगत हाजी हाफिज वहाब साहेब, दिवंगत मौलाना कलामुल कादरी मिसबाही, सय्यद अब्दुस्सलाम पीरजादा, आणि हाजी सय्यद अब्दुलअलीम पीरजादा यांनी सुरू केला होता.
या वर्षी हाफिज अहमद रजा यांनी कुरआन पठण केले, तर मौलाना रेहान रजा यांनी नमाजेची इमामत केली. तसेच, हाफिज वरद कादरी यांनी हिफ्ज-ए-कुरआन पूर्ण केले. उपस्थित मान्यवरांमध्ये कारी मौलाना वसील कादरी, हाफिज फाजिल कादरी, आणि हाफिज रेहान कादरी यांचा समावेश होता.

कार्यक्रमाची सुरुवात हाफिज साहेबांच्या गुलपोशी आणि नजराण्याने झाली. ट्रस्टी आणि उपस्थित नमाज्यांनी मिळून ₹1,00,000 (एक लाख) रुपयांचे नजराणे अर्पण केले. प्रमुख दात्यांमध्ये हाजी अलीम कादरी, अब्दुस्सलाम कादरी, शहर काझी अब्दुलरकीब कादरी, आणि सय्यद मुतसिब कादरी यांचा समावेश होता.
१० दिवसांच्या या धार्मिक सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तसेच, रोजेदारांसाठी भोजन व्यवस्थेची जबाबदारी राजे कादरी कमिटी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समर्थपणे सांभाळली. सेवाकार्यात अझहर कादरी, फखीम कादरी, दिलमीर कादरी, जामिल कादरी, काशिफ कादरी, फैजल, बख्तियार, कैफ, लामाज, काशान, मोईन, नूरू भाई, इम्रान भाई आणि मुजाहिद भाई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जामिल कादरी यांनी केले आणि संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
“आमचा उद्देश केवळ उपासना नाही, तर समाजाच्या भल्यासाठी चांगल्या कार्यांचा प्रचार करणे आहे. अल्लाह ताआला ही परंपरा कायम ठेवो. आमीन!” —जमील कादरी
