नाशिक कुंभमेळ्यापूर्वी गोदावरी आणि उपनद्यांच्या स्वच्छतेसाठी ठोस कृती करा —
आमदार सत्यजित तांबे यांची विधान परिषदेत मागणी
मुंबई दि. 19
देशातील व महाराष्ट्रातील वाढत्या नदी प्रदूषणावर विधान परिषदेत चर्चा झाली. यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी महाराष्ट्रातील नदी स्वच्छता व संवर्धनासाठी सरकारकडे महत्त्वाच्या सूचना मांडल्या. त्यामध्ये प्राधान्याने नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी आणि उपनद्यांची स्वच्छता तातडीने करण्यासाठी ठोस कृती करावी अशी मागणी त्यांनी केली.

आमदार तांबे यांनी विविध सूचना मांडल्या त्यामध्ये जागतिक पातळीवरील यशस्वी प्रकल्पांचा अवलंब करा असे हे ते म्हणाले. The Ocean Cleanup ही संस्था भारतात Bharat River Foundation च्या सहकार्याने कार्यरत असून मुंबई परिसरात प्रभावी काम करत आहे.

आमदार तांबे हे या संस्थेचे सल्लागार सदस्य आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून महाराष्ट्रातील 55 नद्यांच्या स्वच्छतेसाठी सरकारने तातडीने प्राधान्यक्रम ठरवावा, अशीही सूचना त्यांनी केली.
महाकुंभ मेळ्यात गंगा नदीच्या गुणवत्तेवर प्रश्न उठले होते. 2027 च्या नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी व उपनदी प्रवरा स्वच्छतेसाठी सरकार कोणते उपाय करत आहे ? याबाबत सरकारकडून त्यांनी स्पष्टता मागितली.

त्यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी “नमामि गंगे” धर्तीवर तांत्रिक उपायांचा अवलंब करण्याचे आश्वासन दिले. नाशिक कुंभमेळ्याला काहीच महिने उरले आहेत. युद्धपातळीवर कृती झाली पाहिजे, हीच आमचे ठाम मागणी असल्याचेही तांबे यांनी स्पष्ट केले. या संदर्भाने त्यांनी सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट केली आहे.
