महसूल मंडळाची फेररचना होणार — आमदार अमोल खताळ
महसूल मंत्री, पालकमंत्री आणि अप्पर सचिवांकडे केली होती मागणी
मात्र प्रशासनाचा दुजोरा नाही
संगमनेर दि.२० प्रतिनिधी —
महसूल मंडळाची फेररचना केल्याशिवाय आश्वी येथील अप्पर तहसिल कार्यालाचा प्रस्ताव मंजूर करू नका आशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि महसूल विभागाच्या अप्पर सचिवांकडे केली असून, तशा सूचनाही त्यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या असल्याचे सांगितले ही माहिती आमदार खताळ यांच्या प्रसिद्धी विभागा कडून देण्यात आलेल्या प्रेस नोट मध्ये दिली आहे.

प्रेस नोट मध्ये म्हटले आहे की, आश्वी येथे अप्पर तहसिल कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव तहसिल कार्यालयाने वरिष्ठांना सादर केला होता.यासर्व पार्श्वभूमीवर आ.अमोल खताळ यांनी महसूल मंत्री बावनकुळे पालकमंत्री विखे पाटील आणि विभागाच्या अप्पर सचिवांची भेट घेवून केल्यानंतर महसूल मंडळाच्या फेररचनेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अप्पर तहसिल कार्यालयाचा प्रस्ताव पाठविण्यापुर्वी महसूल मंडळाची फेररचना होणे अत्यंत गरजेचे होते.मात्र याबबात तहसिल कार्यालयाने लोकप्रतिनीधीशी कोणतीही चर्चा न करता व संबधित गावातील लोकांच्या भावना विचारात न घेता प्रस्ताव सादर केल्याने संभ्रम निर्माण झाल्याची बाब आ.खताळ यांनी अप्पर महसूल सचिवांच्या निदर्शनास आणून दिली.

तहसिल कार्यालयाने सादर केलेल्या प्रसतावाची कागदपत्र समाज माध्यमामधून समोर आल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला याचे गांभीर्य सुध्दा त्यांनी वरीष्ठांच्या लक्षात आणून दिले.
महसूल मंडळाची फेररचना झाल्यानंतरच तालुक्यातील जनतेसाठी सोयीचे ठिकाण निश्चित करून अप्पर तहसिल कार्यालयाची स्थापना करण्याच्या मागणीला महसूल मंत्री बावनकुळे, पालकमंत्री विखे पाटील आणि अप्पर सचिवांनी सकारात्मक प्रतिसाद देवून याबाबत जिल्हा प्रशासनास सूचना दिल्या असल्याचे आमदार खताळ म्हणाले.

याबाबत कोण काय आरोप करतो याला मी महत्व देत नाही. सामान्य जनता माझ्या पाठीशी असल्याने त्यांच्या भावनांचा आदर करूनच निर्णय होईल याची खात्री आहे. यासंदर्भात पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील महसूल मंडळाची फेररचना केल्याशिवाय कोणताही निर्णय होणार नसल्याच्या भूमिकेचे खताळ यांनी स्वागत करून त्यांचे आभार मानले आहेत असे प्रेस नोट मध्ये म्हटले आहे.
