घारगाव पोलिसांची मोठी कारवाई ; गोवंश जनावरांसह वाहने पकडली !

१६ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त ; संगमनेरच्या १० जणांवर गुन्हा दाखल 

घारगाव प्रतिनिधी दि. 15 

बेकायदेशीर कत्तलखाने आणि गोवंश हत्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या संगमनेर मधील सातत्याने गोवंश हत्या होत असल्याचे उघड होत आहे. घारगाव पोलिसांनी या संदर्भात मोठी कारवाई केली असून 17 गोवंश जनावरांसह 10 जणांवर गुन्हा दाखल केला असून 16 लाख 81 हजार रुपयांचा मुद्दाम हस्तगत केला आहे.

याबाबतची माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील पठार भागात असणाऱ्या खालची माहुली या नावाच्या शिवारात पुणे नाशिक महामार्गावर साईबाबा मंदिर समोर सहा वाहनांमध्ये गोवंश जनावरे यामध्ये गाया, वासरे चारा पाण्याविना दाटीवाटीने बांधून भरून घेऊन जात असताना आढळून आले. बजरंग दलाचे कार्यकर्ते रोशन रमेश कवडे (राहणार जवळे बाळेश्वर, तालुका संगमनेर) ऋषिकेश सखाराम भोर आणि दादाभाऊ अण्णा खरात यांनी या गाड्या अडविल्या आणि संबंधितांवर घारगाव पोलिसांनी कारवाई करावी म्हणून पोलिसांना कळविले.

त्यानंतर याप्रकारे घारगाव पोलिसांनी सर्व मुद्देमाल ताब्यात घेत गुन्हा दाखल केला असून जनावरांनी भरलेल्या सहा पिकअप व इतर गाड्या ताब्यात घेतल्या.

फारुख युसुफ सय्यद (राहणार अलकानगर, संगमनेर) शहाबाज अजिज शेख (राहणार कुरण रोड, संगमनेर) शब्बीर शेख (राहणार संगमनेर खुर्द, संगमनेर) संतोष सखाराम भिसे (राहणार डिग्रज, तालुका संगमनेर) मोबीन शेखलाल शेख (राहणार मदिनानगर, संगमनेर) साद शफिक शेख (राहणार संगमनेर खुर्द, संगमनेर) अजीज छोटू शेख (राहणार संगमनेर खुर्द, संगमनेर) अजय सुरेश शिंदे (हिवरे तरफे, नारायणगाव) अजहर मोईन शेख (राहणार संगमनेर खुर्द, संगमनेर) माणिक बाळू मोरे (राहणार डिग्रस, तालुका संगमनेर) अशा दहा जणांवर गुन्हा दाखल केलाआहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!