बाथरूममध्ये अंघोळ करणाऱ्या अल्पवयीन मुलीचा काढला व्हिडिओ…

ॲट्रॉसिटी व पोक्सोनुसार गुन्हा दाखल

संगमनेर तालुक्यातील घटना

प्रतिनिधी संगमनेर, दि. 11 –

घरासमोर तात्पुरता आडोसा करून उभारण्यात आलेल्या बाथरूममध्ये आंघोळ करत असताना एका अल्पवयीन मुलीचा व्हिडिओ काढल्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेर तालुक्यातील या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अकबर युनूस सय्यद (रा. चिंचोली गुरव, संगमनेर) या आरोपी विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो), अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा, भारतीय न्याय संहिता कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी, मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील दहावीमध्ये शिकत असलेली सोळा वर्षीय वयाची पीडित तरुणी घरासमोर बॅनरच्या कागदाचा आडोसा करून तयार करण्यात आलेल्या बाथरूममध्ये सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आंघोळ करत होती.
वरतून छत नसलेल्या बाथरूममध्ये पीडित तरुणी आंघोळ करत असताना शेजारी गवताच्या ढिगावर उभा राहून आरोपीने आपल्या जवळील मोबाईलच्या सहाय्याने बाथरूमच्या उघड्या छतातून पीडित तरुणीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढत असल्याचे या तरुणीच्या लक्षात आले. त्यामुळे तिने आरडाओरडा केल्याने आरोपीने तेथून पळ काढला.

मुलीचा आवाज ऐकून पीडित तरुणीची आई तेथे आली. तिने झालेला प्रकार आईला सांगितला. त्यामुळे नातेवाईकांनी आरोपीच्या घराबाहेर जात यासंदर्भात विचारणा केली असता आरोपीने व्हिडिओ संबंधात माहिती देण्यास टाळाटाळ केली.
त्यामुळे सोमवारी रात्री पीडित तरुणीने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात येत आरोपी अकबर युनूस सय्यद याच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीवरून सय्यद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुका पोलिसांसह पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे यासंदर्भात स्वतः तपास करत आहेत.
दरम्यान या घटनेचा सर्वत्र निषेध होत असून बजरंग दल, संगमनेर यांनी आंदोलन हाती घेतले आहे. तपासी यंत्रणेने सखोल तपास करण्याची मागणी होत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!