बांगलादेशींची धरपकड सुरू…
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी दि. 27
अनधिकृतपणे वास्तव करणाऱ्या नागरीकांची शोध मोहिम अधिक तीव्र करण्यात आली असून वसई, विरार – मिरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या सहकार्याने नालासोपारा येथून 9 बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. अशा प्रकारे राहणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरू ठेवण्यात आली आहे.

महाराष्ट्रात अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या घुसखोरी करून अवैध रीतीने देशात छुप्या पद्धतीने राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरां विरोधात त्वरित कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि अन्य संबंधित यंत्रणांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून हे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशानंतर राज्यात अनेक ठिकाणी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.

त्यामुळे सध्या मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयामार्फत अशा प्रकारे वास्तव करणाऱ्या नागरीकांची शोध मोहिम अधिक तीव्र केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नालासोपारा पूर्वेकडील, गांगडीपाडी, धानीव बाग भागवत बिल्डिंग या ठिकाणी परदेशातील नागरीक बेकायदेशीररित्या वास्तव्य करीत असलेल्या बांगलादेशी नागरीकांचा शोध घेवून त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.त्यांची तपासणी केल्यावर त्यांनी आपण बांगलादेशी असल्याचे कबूल केले आहे असे पोलिसांनी सांगितले.
गरीबी, बेरोजगारी, भूकमारी याला कंटाळून बांगलादेशातील नागरिक अत्यंत मोठा धोका पत्करत छुप्या मार्गाने भारतात प्रवेश करत आहेत. भिवंडी मध्ये अशा सुमारे दोन लाख नागरिकांनी जन्म दाखला साठी
प्रमाणपत्र मिळावे म्हणून अर्ज केलेले असल्याचेही समोर आले असून त्याही दृष्टीने तपास सुरू आहे.
