अवैध धंद्यांचे केंद्र असलेल्या “अकोले नाका” येथे संगमनेर पोलिसांची कारवाई 

प्रजासत्ताकदिनी दारू विकणाऱ्यांना पकडले 

संगमनेर दि. 27 प्रतिनिधी —

संगमनेर शहरातील अवैध धंद्यांचे केंद्र असणाऱ्या पैकी अकोले नाका या ठिकाणी संगमनेर शहर पोलिसांनी प्रजासत्ताक दिनी कारवाई करत अवैधरित्या देशी दारू विकणाऱ्या तीन ते चार जणांना छापे मारून पकडले आहे. ही दारू विक्री करण्यात काही महिलांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

प्रजासत्ताक दिनी ड्राय डे घोषित करण्यात आलेला असतो. या दिवशी मद्य विक्रीस बंदी असते. मात्र संगमनेर शहरातील अकोले नाका परिसरात कुठल्याही प्रकारचा अवैध धंदा करण्यास बंदी नसल्याचे चित्र अनेक दिवसांपासून दिसत आहे. या परिसरात सर्व प्रकारचे अवैध धंदे केले जातात. विशेषतः दारू आणि गांजा या दोन नशेच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर अवैधरीत्या विक्री केली जाते. पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करण्याचे वेळोवेळी टाळले आहे.

मात्र प्रजासत्ताक दिनी सुद्धा या ठिकाणी दारू विक्री केली जात असल्याचे संगमनेर शहर पोलिसांना समजल्यानंतर या ठिकाणी कारवाई करण्यात येऊन दारू विकणाऱ्या महिला मीरा भरत सोनवणे (अकोले नाका) जुलेखा शौकत शेख (अकोले नाका) संदीप भाऊसाहेब शेटे (मूळ राहणार धांदरफळ) किरण बबन नाईक (मूळ राहणार बुळकुंडे मळा, ढोलेवाडी रोड) या सर्वांवर प्रजासत्ताक दिनी दुपारी साडेअकरा ते एकच्या दरम्यान कारवाई करण्यात आली. यातील महिला मात्र फरार झाल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे सर्वजण अकोले नाका परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी अवैध रित्या देशी दारू विक्री करत होते. एकाच परिसरात देशी दारू विक्री करत असल्याचे आढळून आल्याने या परिसरात किती मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू आहेत हे समोर येत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!