दरोड्याच्या तयारीत असलेले ९ जण पकडले !
१२ लाखाचा मुद्देमाल हस्तगत
अहिल्यानगर दि. 23
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ९ जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिरजगाव कर्जत रोड वरील पठारवाडी जवळ पकडले आहे. त्यांच्याकडून 12 लाख 16 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे. एका व्यापाऱ्याला लुटण्याचा गुन्हा देखील उघड झाला आहे.
पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार बबन मखरे, फुरकान शेख, संदीप दरंदले, राहुल सोळंके, सोमनाथ झांबरे, रोहित येमुल, आकाश काळे, शिवाजी ढाकणे, जालींदर माने, किशोर शिरसाठ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व अरूण मोरे आदींनीही कामगिरी पार पाडली आहे.
दिनांक 21/01/2025 रोजी रात्री तपास पथक कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना सफौ/बबन मखरे यांना गुप्तबातमीदारा मार्फत संदीप बबन बर्डे, (रा.बीड) हा त्याच्या 8 ते 9 साथीदारासह स्कॉर्पिओ गाडी व मोटार सायकलवर येऊन मिरजगाव ते कर्जत रोडवर, पठारवाडी फाटयाजवळ दरोडा घालण्याच्या तयारीत अंधारात दबा धरून बसलेले आहेत अशी माहिती मिळाली.
पथकाने तात्काळ माहितीतील ठिकाणी खात्री केली असता पठारवाडीकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला अंधारामध्ये एक चारचाकी गाडी व मोटार सायकलजवळ 9 ते 10 जण संशयीतरीत्या मिळून आल्याने पथक संशयीतांना पकडण्याच्या तयारीत असतांना एकजण प्लॅटिना मोटार सायकलवर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. उर्वरीत 9 संशयीत इसमांना ताब्यात घेण्यात आले. 1) संदीप बबन बर्डे, वय 32, रा.वारणी, ता.शिरूरकासार, जि.बीड 2) विनोद बबन बर्डे, वय 27, रा.वारणी, ता.शिरूरकासार, जि.बीड 3) राहुल दिलीप येवले, वय 22, रा.वारणी, ता.शिरूरकासार, जि.बीड 4) शुभम महादेव धायतडक, वय 22, रा.धायतडकवाडी, ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर 5) आकाश माणिक चव्हाण, वय 23, रा.वारणी, ता.शिरूरकासार, जि.बीड 6) दिलीप यल्लप्पा फुलमाळी, वय 21, रा.वारणी, ता.शिरूरकासार, जि.बीड 7) संजय छबुराव गायकवाड, वय 30, रा.वारणी, ता.शिरूरकासार, जि.बीड 8) बाळासाहेब दगडू बडे, वय 23, रा.टाकळीमानूर, ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर 9) एक विधीसंघर्षित बालक, वय 17 अशी संशयित आरोपींची नावे आहेत. संदीप बबन बर्डे याच्याकडे पळून गेलेल्या इसमांचे नांव विचारले असता त्याने 10) भारत यल्लप्पा फुलमाळी, रा.वारणी, ता.शिरूरकासार, जि.बीड (फरार) असे असल्याचे त्यांनी सांगितले.
ताब्यात घेतलेल्या संशयीतांना अंधारात थांबण्याचे कारण विचारले असता त्यांनी काहीएक समाधान कारक उत्तर दिले नाही. त्यामुळे पथकाने संशयीतांची अंगझडती घेता त्यांचे कब्जात 1 तलवार, 1 लोखंडी कत्ती, 1 लोखंडी पाईप, 1 चाकु, 2 लाकडी दांडे, 1 गलोल, मिरची पावडर पॅकेट, 10 मोबाईल मिळून आले तसेच एक टाटा कंपनीची स्कॉर्पिओ क्रमांक एमएच 12 जेसी 4608 असा एकुण 12,16,150/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
1) राहुल दिलीप येवले, (वय 22, रा.वारणी, ता.शिरूरकासार, जि.बीड) याने मागील काही दिवसापुर्वी 2) शुभम महादेव धायतडक, (वय 22, रा.धायतडकवाडी, ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर) 3) हनु उर्फ हनुमंत अशोक गोल्हार, (रा.जवळवाडी, ता.पाथर्डी) 4) अमोल उर्फ सोन्या सुभाष मंजुळे व 5) बाळासाहेब दगडू बडे, (रा.टाकळीमानूर, ता.पाथर्डी) अशांनी मिळून कृषी उत्पन्न बाजार समितीचे गेटसमोर एका व्यापाऱ्याच्या डोळयामध्ये मिरची पुड टाकुन त्यास लुटण्याचा प्रयत्न केला. आरोपीने दिलेल्या माहितीवरून कर्जत पोलीस स्टेशनचे अभिलेखावरील गुरनं 25/2025 बीएनएस कलम 309 (6) सह आर्म ऍ़क्ट 3/25 प्रमाणे गुन्हा उघडकीस आलेला आहे.
वर नमूद आरोपीविरूध्द कर्जत पोलीस स्टेशन गुरनं 34/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310 (4), 310 (5), 310 (6) सह आर्म ऍ़क्ट 4/25 प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपीस मुद्देमालासह कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन हे करीत आहेत.