अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या पतीचा बायकोनेच केला खून

भाऊ आणि प्रियकराची घेतली मदत

प्रतिनिधी दि. 22

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीला भावाची आणि प्रियकराची मदत घेत बायकोनेच गळफास देऊन, डोक्यात दगड घालून, चेहरा विद्रुप करून ठार मारले व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शेतामधील मुरूमाच्या खदानीमध्ये प्रेत अर्धवट पुरून टाकल्याची घटना कर्जत तालुक्यातील रवळगाव शिवारात घडली होती. मयत व्यक्तीचे वय 35 ते 40 होते. या सर्व प्रकरणाची उकल करून नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने हा गुन्हा उघडकीस आणला आहे व मयताची पत्नी तिचा भाऊ आणि प्रियकराला अटक केली आहे.

याबाबत मिरजगाव पोलीस ठाणे गु.र.नं. 10/2025 बीएनएस कलम 103 (1), 238 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याची उकल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाल दिले होते.

पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/तुषार धाकराव, पोसई/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार बबन मखरे, विश्वास बेरड, हृदय घोडके, फुरकान शेख, रमिजराजा आत्तार, विशाल तनपुरे, रविंद्र घुंगासे, प्रमोद जाधव, भाऊसाहेब काळे, आकाश काळे, बाळासाहेब खेडकर, मेघराज कोल्हे व भाग्यश्री भिटे अशांचे दोन पथक नेमुण गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले.

तपासात पथकाने तात्काळ घटनाठिकाणी भेट देऊन आसपासच्या साक्षीदाराकडे विचारपुस करून, तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे घटनाठिकाणाचे जवळपासचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून, आरोपीचा शोध घेत असताना निरीक्षक अविनाश शिळीमकर, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व पोलीस अंमलदार विशाल कांचन यांच्या मदतीने पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा संतोष शिवाजी काळे, रा.पळसदेव, ता.इंदापूर, जि.पुणे याने त्याचे साथीदारासह केल्याची माहिती मिळाली. पथकाने संशयीत आरोपीचा शोध घेऊन तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले.त्यास नाव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) संतोष शिवाजी काळे, वय 44, रा.पळसदेव, ता.इंदापूर, जि.पुणे असे असल्याचे सांगीतले.

ताब्यातील आरोपीस गुन्हयांचे अनुषंगाने विचारपुस करता त्याचेमध्ये व ललिता दत्तात्रय राठोड, रा.जमशेदपूर, ता.डिग्रस, जि.यवतमाळ हिचे अवैध प्रेमसबंध होते. त्यांचेमधील प्रेमसबंधाला तिचा पती हा विरोध करत असल्याने त्यांनी ललिता राठोड हिचा भाऊ प्रविण प्रल्हाद जाधव, (रा.सिंगर, ता.डिग्रस, जि.यवतमाळ) अशांनी मिळून यातील मयत दत्तात्रय वामन राठोड, (रा.जमशेदपूर, ता.डिग्रस, जि.यवतमाळ) याचा गळा आवळून जीवे ठार मारले असल्याची माहिती सांगीतली.

पथकाने संतोष शिवाजी काळे यास अधिक विश्वासात घेऊन गुन्हयांचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने सांगीतले की, मागील दोन वर्षापासुन गुन्हयातील मयत दत्तात्रय वामन राठोड व त्याची पत्नी ललिता दत्तात्रय राठोड व तिचा भाऊ प्रविण प्रल्हाद जाधव असे ऊस तोडणीचे कामास होते. त्यातून ओळख होऊन संतोष शिवाजी काळे व ललिता दत्तात्रय राठोड यांचेत प्रेमसंबंध निर्माण झाले. याची माहिती ललिता हिचा भाऊ प्रविण प्रल्हाद जाधव यास झाली होती. तसेच ललिता राठोड हिचा पती दत्तात्रय राठोड हा दारू पिऊन तिचेवर संशय घेऊन ललिता राठोड हिस सतत मारहाण करत होता.

दिनांक 08/01/2025 रोजी रात्री आरोपी संतोष शिवाजी काळे हा ललिता दत्तात्रय राठोड हिला भेटण्यासाठी गेला. त्यावेळी तिचा पती दत्तात्रय वामन राठोड तेथे आला व त्यांचेत वाद होऊन त्याने पत्नी ललिता हिस मारहाण केली. त्यावेळी संतोष शिवाजी काळे, मयताची पत्नी ललिता दत्तात्रय राठोड व प्रविण प्रल्हाद जाधव अशांनी मिळून दत्तात्रय वामन राठोड यास मारहाण करून, त्याचा गळा दोरीने आवळून त्यास जीवे ठार मारले. दत्तात्रय वामन राठोड याचा मृतदेह रात्री ते राहात असलेल्या कोपीमध्ये ठेवला.

Oplus_131072

दिनांक 09/01/2025 रोजी संतोष शिवाजी काळे याने त्याचेकडील चार चाकी वाहनाने दत्तात्रय वामन राठोड याचा मृतदेह प्रविण प्रल्हाद जाधव याचेसह मिरजगाव परिसरामधील एका शेतातील खड्डयामध्ये टाकला. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणुन तेथील एक दगड उचलून तोंडावर टाकला अशी माहिती सांगीतली. तसेच आरोपी ललिता राठोड व तिचा भाऊ प्रविण जाधव हे त्यांचे गावी यवतमाळ येथे गेल्याची माहिती सांगीतली.

पथकाने दिनांक 21/01/2025 रोजी तांत्रीक विश्लेषण व माहितीच्या आधारे प्रविण जाधव व ललिता राठोड याचा यवतमाळ येथे शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. आरोपीतांना गुन्हयाचे तपासकामी मिरजगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास मिरजगाव पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!