प्रयागराज महाकुंभसाठी संगमनेरात प्रस्थान मिरवणूकीचे आयोजन…
संगमनेर दि. 22
सुमारे १४४ वर्षानंतर प्रयागराज या ठिकाणी सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात सहभाग नोंदविण्यासाठी भक्तांच्या प्रस्थान मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
शहरातील प्रवरामाईच्या कुशीत असलेले हनुमान टेकडी, श्री कपिला आश्रम, गंगामाई घाट (श्री पंचदशनाम जुना आखाडा बडा हनुमान घाट, काशी महाराष्ट्र विभाग ) श्री श्री १०८ ब्रम्हलिन श्री महंत उज्जैनपुरीजी महाराज (बहिरेबाबा) यांच्या पर्मशीर्वादाने परमपूज्य ब्रह्मलिन महंत सुभाषपुरीजी महाराज (कळस) परमपूज्य ब्रह्मलिन महंत महेंद्रपुरीजी महाराज (संगमनेर) परमपूज्य ब्रह्मलिन महंत संतोषपुरीजी महाराज (वरची माऊली) यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संगमनेर पुण्यभूमी मधून सनातन हिंदुधर्माची पताका / धर्मज्योत महंत गणेशपुरीजी महाराज कपिल आश्रम, हनुमान टेकडी यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभ महापर्व, प्रयागराज महापर्वाला सुरुवात झाली असून या महापर्वाला आपणही सामील होवून याची देही याची डोळा हा धर्म सोहळा पाहण्याचे, अनुभवण्याचे योग महंत गणेशपुरीजी महाराज आपल्या संगमनेर तालुक्यातील भक्त परिवाराला मिळवून देत आहेत.
तसेच ब्राम्हलीन बहिरेबाबा यांनी घालून दिलेल्या परंपरेनुसार संगमनेर तालुक्यातील पंचक्रोशी मधील तमाम भक्त परिवाराकडून कपिल आश्रम हनुमान टेकडीचे महंत गणेशपुरी महाराज यांच्या माध्यमातून अन्न, धान्य, कपडा, रोख रक्कम दान देण्याचे आणि महाकुंभ प्रयागराज येथे परंपरेगत जेवणाची पंगत देण्यात येणार आहे आहे.
यानिमित्ताने शुक्रवार दि. 24 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता रंगारगल्ली शनिमंदिर येथून मिरवणूक प्रारंभ होऊन चंद्रशेखर चौक – नेहरू चौक – तेलीखुंट – बाजारपेठ – नगरपालिका -मेनरोड – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – बस स्थानक ह्या मार्गे फिरून महंत गणेशपुरी महाराजांसहित बाबाजींचे तमाम भक्तगण यांचे प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभसाठी प्रस्थान होणार आहे.
याप्रसंगी शहरातील हिंदुत्ववादी संघटना, हिंदू बांधव, माता भगीनींनी, शहरातील सर्व भक्तांनी उपस्थित राहून मिरवणूकीची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे.