वादग्रस्त अनधिकृत सागर वाईन्स देशी दारू दुकानाविरोधात आमरण उपोषण सुरु !

कुणाच्या मर्जीने हे सगळं सुरु ?  उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सामील आहेत का ? चौकशीची मागणी  

संगमनेर दि. 20

शहर प्रतिनिधी – मोहसीन रशीद शेख

संगमनेर शहरातील दिल्ली नाका येथील नगरपालिकेच्या शासकीय जागेत असलेल्या अनधिकृत सागर वाईन्स, सरकारमान्य देशी दारूच्या दुकानाविरोधात आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. सदरील दुकानाचे बोगस लायसन्स रद्द व्हावे नगरपालिकेने अनधिकृत अतिक्रमण हटवावे अशा मागण्या उपोषणकर्त्या सामाजिक कार्यकर्त्या बानोबी शेख यांनी केल्या आहेत.

सदरील दुकान हे अनेक वर्षांपासून खोटी कागदपत्रे बनवून नगरपालिका व उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्यांत धूळफेक करत चालवत असल्याचा आरोप बानोबी शेख यांनी केला असून सदरील दुकान तात्काळ बंद करून खोटे कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. आता नगरपालिका प्राशासन व उत्पादन शुल्क विभाग काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

उपोषणकर्त्या शेख यांनी या संदर्भात नगरपालिका व उत्पादन शुल्क विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. परंतु संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याने आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आला. सदरील बाब जिल्हा अधीक्षक उत्पादन शुल्क विभाग, अहिल्यानगर यांच्या सुद्धा लक्षात आणून दिली होती परंतु त्यांच्याकडून सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याने आता या प्रकरणात कोण कोण सामील आहेत ? कुणाचे हाथ रंगलेत ? याची सुद्धा चौकशीची मागणी नागरिकांमधून होतांना दिसत आहे.

उपोषणाला भरभरून प्रतिसाद – 

आज सकाळी उपोषण सुरू केल्यानंतर बानोबी शेख यांच्या उपोषणाला भरभरून प्रतिसाद मिळत असून आज शहरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, विविध संघटनांनी उपोषण स्थळी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!