संगमनेरमध्ये अवैधपणे सुरु असलेले वाईन देशी दारू दुकान तात्काळ बंद करण्याची मागणी

पालिका व पोलीस अधिकाऱ्यांना स्थानिकांचा घेराव ; आंदोलनाचा इशारा 

संगमनेर दि.

संगमनेर शहरात दिल्ली नाका परिसरात असलेल्या सागर वाईन देशी दारू दुकान हे गेल्या अनेक वर्षांपासून अवैधपणे चालू आहे. याबाबत नगरपालिका प्रशासनला वारंवार अर्ज देऊनही कारवाई होत नाही. म्हणून आज स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत हे दारू दुकान बंद करण्यासाठी स्थानिक पोलीस व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दुकान बंद करण्याची मागणी केली आहे.

खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे सदरील वाईन देशी दारु विक्री करण्याचे लायसन्स मिळविलेले असल्याचे समजले. विशेष म्हणजे सदरील दुकानाची जागा ही नगरपालिकेची जागा असून बेकायदेशीरपणे या जागेवर हे दारू दुकान सुरू असल्याचा आरोप करण्यात आला.

सदरील लायसन मिळविण्यासाठी लायसन धारकाने नगरपालिकेचे शिक्के, लेटर पॅड, त्याचप्रमाणे कराची पावती असे विविध दस्त खोटे आणि बनावट पद्धतीने बनून लायसन मिळविणेकामी संबंधित कार्यालयाकडे सादर केले असल्याचा खुलासा नगरपालिकेने केलेला आहे असे आंदोलन करता बानोबी शेख यांनी सांगितले आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे बनावट लायसन मिळवणाऱ्या सदरचे दुकान चालक मालकावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली आहे.

संगमनेर शहरामध्ये अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू असताना स्थानिक, पालिकेचे आजी-माज पदाधिकारी, नेते पुढारी प्रशासकीय अधिकाऱ्यांना घेराव घालत सदरच्या अवैध दारू दुकानाचा आपण त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी केली.

या देशी दारू दुकानाविरोधात सामाजिक कार्यकर्त्या बानोबी शेख यांच्यासह सहकाऱ्यांची एक वर्षापासून पाठपुराव्याची लढाई सुरू आहे. दारूबंदी विभाग जिल्हा अधीक्षक अहिल्यानगर, संगमनेर नगरपालिका मुख्याधिकारी संगमनेर, शहर पोलीस निरीक्षक, संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी यांना आमरण उपोषणाचे निवेदन देऊन उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!