हजरत सय्यद बाबा उरूस दरम्यान संदल मिरवणुकीत डीजे सह ढोल ताशा पथक, बँजो पार्टी यांना परवानगी देण्यात येऊ नये…
संगमनेर शहर मौलाना अहेले सुन्नत वल जमाअत यांची पोलिसांकडे मागणी
संगमनेर दि. 11
हिंदू मुस्लिम दोन्ही धर्मियांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या हजरत सय्यद बाबा त्यांचा उरूस यावर्षी 21 जानेवारीपासून सुरू होत आहे. उरूस दरम्यान येणाऱ्या संदल मिरवणुका मधून डीजे, ढोल ताशा पथक, बँजो पार्टी यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यामुळे ध्वनी प्रदूषण आणि तरुणांमध्ये वाद देखील होतात. म्हणून संदल मिरवणुकीसाठी डीजे, ढोल ताशा पथक, बँजो पार्टी यांना परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी संगमनेर शहर मौलाना अहेले सुन्नत वल जमाअत त्यांच्यातर्फे शहर पोलिसांकडे करण्यात आली आहे.

पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी येत्या 21 जानेवारी ते 26 जानेवारी पर्यंत हजरत सय्यद शाह बाबा यांचा उरूस होणार आहे. त्यामध्ये शूटिंग व्हॉलीबॉल, मुशायरा, कव्वाली, संदल चा प्रोग्राम होत असतो. संगमनेर शहर व आसपास च्या खेड्यापाड्यातील लोक मोठ्या संख्येने उरूस साठी येतात त्यामध्ये लहान मुलं व स्त्रियांचा प्रमाण जास्त असते.

विशेषतः संदल मध्ये भाविकांकडून दर्ग्यात चादर आणली जाते. त्यामध्ये ही चादर वेगवेगळ्या ठिकाणाहून ( D.J) व ढोल ताशा पथक, बॅन्जो पार्टी मार्फत गाजत वाजत येते. तरुण मुलांचा यामध्ये मोठा सहभाग असतो. आणि ( D.J ) व ढोल ताशा पथक, बॅन्जो पार्टीच्या तालावर नाचत असताना गर्दीमध्ये अनेक तरुणांचे मारामाऱ्या, धक्काबुक्की होते. परिणामी हेच वाद पुढे मोठ्या भांडणात रूपांतर होते. एकच ठिकाणी (D.J) व ढोल ताशा पथक, बॅन्जो पार्टी जास्त वेळ वाजत असल्यामुळे त्या ठिकाणी रस्त्याचा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

तरी आपण हजरत सय्यद शाह बाबा उरुस मध्ये संदल साठी परमिशन मागणाऱ्या नागरिकांस (D.J) ची परमिशन नाकारून सर्वसामान्य पारंपारिक (मिलाद) या पद्धतीने संदल साठी परमिशन द्यावी अशी नम्र विनंती. की जेणेकरून गावात शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. पारंपरिक पद्धतीने संदल साजरा व्हावा यासाठी आम्ही गावात फिरून सर्व आयोजकांना नम्र विनंती केली आहे. जर एखाद्या इसमाने याव्यतिरिक्त (D.J) मार्फत चादर आणण्याचा प्रयत्न केल्यास त्या साऊंड सिस्टमचा नुकसान होण्याची दाट शक्यता आहे तरी सदर नुकसानीस संबंधित साऊंड सिस्टम वाला व संबंधित आयोजक हे जबाबदार राहतील याची कृपया नोंद घ्यावी. असे हे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

