पाच लाखांच्या खंडणीची मागणी ; महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल             

जुन्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल करून बदनामीची धमकी                            

संगमनेर दि. 20

बदनामी करण्याच्या उद्देशाने साखरपुड्याचे जुने फोटो व्हायरल करून त्या बदल्यात पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

कृष्णा अजित सारडा (रा. अशोक चौक) गोविंद नागरे (रा. नेहरू चौक) आणि ओंकार राऊत (रा. घुलेवाडी) अशी खंडणी वागणाऱ्या आरोपींची नावे असून सर्वजण संगमनेर मधील रहिवासी आहेत.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, शहरातील एक तरुणी व एका सामाजिक कार्यकर्त्याची बदनामी होईल व या वैवाहिक जिवन संपुष्टात येईल असे माहित असताना देखिल तिघा जणांनी त्यांचे जुने साखरपुड्याचे फोटो व्हायरल करून त्याबदल्यात सामाजिक कार्यकर्त्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती.

या प्रकाराची शहरात जोरदार चर्चा झाली. पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याने संतापलेल्या सदर तरुणीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. आत्महत्या करायला निघालेल्या या पीडित महिलेसोबत महिला मोठ्या संख्येने जमा झाल्या होत्या. सदर विवाहित महिलेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी ओंकार मारूती राऊत रा. घुलेवाडी , गोविंद राम नागरे रा. नेहरू चौक व कृष्णा अजित सारडा रा. अशोक चौक संगमनेर या तिघांविरुद्ध गु.र.नं. ४६/२०२५ भारतीय न्यायसंहिता कलम ३५६(२),३०८(२),३०८(३) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

ब्लॅकमेलिंगची प्रकरणे बाहेर येणार ?                  या प्रकरणात गुन्हा दाखल झालेली कृष्णा सारडा ही महिला युट्युबवर चॅनल चालवते. खंडणी मागणाऱ्यांमध्ये तिचे नाव असल्याने शहरातील महिला पोलीस ठाण्यात जमा झाल्या. त्यानंतर या संतप्त महिला सारडा हिच्या कार्यालयावर जाब विचारण्यासाठी गेल्या असता ती तेथे त्यांना आढळून आली नाही. त्यामुळे त्या पुन्हा पोलिस ठाण्यात आल्या. या प्रकारानंतर शहरातील अनेक ब्लॅकमेलिंगची प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात असून आज पुन्हा काही गुन्हे दाखल होतील अशी चर्चा आहे. कृष्णा सारडा हिचा यापूर्वी तत्कालीन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या सोबतही वाद झाला होता.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!