हे तर बोकडाचे मटण पीस नाही ; अन्य प्राण्याचे ?
संशयावरून हाणामारी — ऍट्रॉसिटीसह एकमेका विरोधात गंभीर गुन्हे दाख
संगमनेर दि. 15
एका गावाहून दुसऱ्या गावी थेट मटणाचे जेवण करण्यासाठी गेलेल्या दोघाजणांनी मटन खाताना मटणाचे पीस हे बोकड मटण नसून दुसऱ्या प्राण्याचे पीस आहे असा संशय घेतल्याने हाणामारी आणि जातीवाचक शिवीगाळ झाल्याची तक्रार झाल्यानंतर एकमेका विरोधात ॲट्रॉसिटी आणि इतर गुन्हे दाखल करण्याची घटना घडली आहे.

संगमनेर तालुक्यातील पठार भागात असणाऱ्या साकूर येथील हॉटेल आसरा या ठिकाणी संगमनेर तालुक्यातीलच अंभोरे गावातून आदिनाथ तुकाराम मोरे (वय 24 वर्ष, धंदा मजुरी, रा. अंभोरे तालुका संगमनेर) हे आपला मित्र केतन याच्या समवेत आसरा हॉटेलमध्ये मटणाचे जेवण करण्यासाठी गेले असता मटणाचे पीस हे बोकडाचे नसल्याचे संशय आला व त्यामुळे मित्राला उलट्या झाल्या. या कारणावरून हॉटेल मालकाला विचारले असता हॉटेल मालक अजिज सय्यद उर्फ पिंटू मामा व अश्रफ सय्यद (दोघे रा. साकुर) यांना राग येऊन जातीवाचक शिवीगाळ करीत मारून टाकण्याची धमकी दिल्याचा फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तर हॉटेलमध्ये जेवणाच्या बिलावरून वरील दोघे मोरे आणि त्यांचा मित्र केतन यांचा हॉटेल मालकाशी वाद झाला. त्यानंतर तेथील त्यांचाच एक मित्र हनुमंता सोन्नर तेथे आला आणि अजिज सय्यद उर्फ पिंटू मामा यांच्या मुलाला म्हणाला की, ‘तुम्ही त्या दोघांना सोडून द्या नाहीतर त्याचे वाईट परिणाम होतील’ अशी धमकी देऊन फोनवरून इतर आरोपींना बोलावून सर्वांनी मिळून फिर्यादीच्या हॉटेलमध्ये घुसून मारहाण करीत तोडफोड करून काउंटर मधील २ हजार रुपये काढून घेतले व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर काढून घेतला. तसेच लोखंडी गजाच्या सहाय्याने सीसीटीव्ही कॅमेरे व हॉटेलमधील इतर साहित्याची तोडफोड केली. तसेच हॉटेलमधील कामगारांना देखील लोखंडी गजाने व लाथा बुक्क्याने जबर मारहाण करीत शिवीगाळ केली अशी फिर्याद अजीज खुदबुद्दीन सय्यद यांनी दिली आहे.

त्यावरून रोहन भरत पेंडभाजे, बाजीराव खेमनर, अक्षय येरमल, संदीप डोंगरे, ओम इघे, महेश कोळेकर, निखिल खेमनर, सागर खेमनर, सागर सोन्नर, ओम जाधव, सोपान खेमनर, प्रवीण कोळेकर, गणेश तोंडे, अक्षय दत्तात्रेय चोरमले, बंटी थोरात (सर्व राहणार साकुर तालुका संगमनेर) आणि मोरे संपूर्ण नाव माहित नाही व मोरे सोबत असलेला एक अनोळखी इसम (दोघे राहणार अंभोरे) यांच्यावर घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

