बहिणीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले ; भावाची फिर्याद
संगमनेरच्या पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल
नाशिक दि. 14
नाशिक येथील रहिवासी असलेल्या एका विवाहितेने तिचा प्रियकर आणि त्याच्या पत्नीच्या जाचाला कंटाळून २८ आत्महत्या केली. याप्रकरणी संगमनेरमधील पती-पत्नी विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत विवाहित महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुक्यातील लोहारे मिरपूर येथील संशयित पती-पत्नी शिवा तेलंग आणि सारिका तेलंग यांच्या विरोधात विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी व संशयित एकाच गावातील रहिवासी आहेत. नाशिक रोड येथील बनकर मळा भागात राहणाऱ्या अर्चना प्रविण गोरे (२८) या विवाहीतेने शनिवारी आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून आत्महत्या केली होती.
प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या झाल्याची मयत अर्चनाच्या भावाने दिली असून पती-पत्नीच्या जाचास कंटाळून आपल्या बहिणीने आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक किरण कोरडे करीत आहेत.

