वरवंडी स्थापलिंग यात्रा आनंदोत्सव !
संगमनेर दि. 6
संगमनेर तालुक्यातील वरवंडी चाळीस क्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आणि गावचे ग्रामदैवत श्री. स्थापलिंग खंडोबा देवस्थान यात्रा महोत्सव रविवार व सोमवार चालू आहे.

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देवस्थानला भेट देत भक्तीमय वातावरणात आराध्य दैवताची पुजा केली प्रसंगी सर्व भाविकांसोबत तळी भरून भाविकांच्या भक्तीमय आनंदोत्सवात सहभागी होऊन सर्वांना यात्रेच्या शुभेच्छा दिल्या, यावेळी ग्रामस्थांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

वरवंडी गावामध्ये ग्रामस्थांसोबत त्यांनी अनेक विषयांवर चर्चा करुन मार्गदर्शन केले. बाळासाहेब थोरात यांच्या विशेष सहकार्याने व मार्गदर्शनाखाली चालू व पूर्ण विविध विकास कामांचा आढावा घेऊन पूर्ण झालेल्या कामांची पाहणी देखील त्यांनी केली. विकास कामांचे उद्घाटन देखील यावेळी त्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी कृषी उत्पन बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, इंद्रजित खेमनर, जयराम ढेरंगे, मीरा शेटे, गावातील ज्येष्ठ नागरिक, युवा वर्ग, ग्रामस्थ, पंचक्रोशीतील भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
