दीपावलीनिमित्त आमदार बाळासाहेब थोरात यांचा व्यापाऱ्यांशी संवाद…
प्रतिनिधी —
दीपावलीनिमित्त आमदार बाळासाहेब थोरात यांनी बाजारपेठ व मेन रोड येथील विविध दुकाने आणि खरेदी करणाऱ्या नागरिकांची आस्थेवाईकपणे चौकशी केली सर्व व्यापारी बंधन सर्व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.


यावेळी समवेत आमदार सत्यजित तांबे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, दिलीप पुंड, किशोर टोकसे, गणेश मादास, रिजवान शेख, योगेश जाजू, सोमनाथ मुर्तडक आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.


थोरात यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून बाजारपेठेत अत्यंत जिव्हाळ्याने प्रत्येकाची चौकशी केली. विविध कापड दुकान, दीपावलीचे स्टॉल, यांसह विविध दुकानांमध्ये जाऊन व्यापारी व नागरिकांशी संवाद साधला.

नागरिकांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समवेत सेल्फी घेण्यासाठी व हात मिळवण्यासाठी गर्दी केली. प्रत्येकाची आपुलकीने चौकशी केली. बाजारामध्ये सुरू असलेल्या खरेदी विक्री बाबतही व्यापाऱ्यांकडून जाणून घेतले.


