महाराष्ट्रातील प्रागतिक पक्षांतर्फे १६ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे भव्य राज्यव्यापी परिषद

प्रतिनिधी —

आज महाराष्ट्रातील प्रागतिक पक्षांच्या मुंबईत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात झालेल्या संयुक्त बैठकीत येत्या बुधवार, १६ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे भव्य राज्यव्यापी परिषद आयोजित करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रभरातून हजारों लोक या परिषदेत सहभागी होतील.

पर्यायी जनताभिमुख धोरणे स्वीकारल्यास आणि सन्मानपूर्वक तडजोड झाल्यास महाविकास आघाडी जास्त मजबूत होईल.

नाशिकच्या ह्या परिषदेत येत्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने पर्यायी जनताभिमुख धोरणे जाहीर करावीत आणि प्रागतिक पक्षांसोबत जागा वाटपाबाबत सन्मानपूर्वक तडजोड करावी अशी आग्रही मागणी करण्यात येईल.

महाविकास आघाडीच्या नेतृत्वासोबत चर्चा करण्यासाठी माजी आमदार जयंत पाटील, आमदार अबू असीम आझमी, डॉ. अशोक ढवळे व डॉ. भालचंद्र कानगो या चार सदस्यांच्या समितीची नेमणूक करण्यात आली.

या बैठकीत शेतकरी कामगार पक्षातर्फे माजी आमदार जयंत पाटील, प्रा. एस. व्ही. जाधव व राजेंद्र कोरडे, समाजवादी पक्षातर्फे मेराज सिद्दीकी व राहुल गायकवाड, भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे डॉ. भालचंद्र कानगो, सुभाष लांडे, प्रकाश रेड्डी, राजू देसले, प्रा. राम बाहेती, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे डॉ. अशोक ढवळे, किसन गुजर, डॉ. एस. के. रेगे, शैलेंद्र कांबळे, आणि सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षातर्फे किशोर ढमाले हजर होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!