आता कत्तलीसाठी आणलेल्या गोवंश जनावरांचे तळ शहरापासून दूर ग्रामीण भागात…

प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात कत्तलीसाठी आणलेल्या गोवंश जनावरांची जमा करून ठेवण्याची ठिकाणे आता समोर येऊ लागली आहेत. धांदरफळ येथे संगमनेर तालुका पोलिसांनी कारवाई करून कत्तलीसाठी आणलेल्या गोवंश जनावरांची सुटका केली आहे.

कौठे धांदरफळ ता. संगमनेर येथे संतोष घुले यांच्या घरासमोर गोवंश वासरे कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने बांधुन ठेवले असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन 11 गोवंश जनावरे ताब्यात घेतली आहेत. संतोष गंगाधर घुले व इम्तीयाज मोमीन या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर वासरे संगोपनाकरीता जिवदया गोरक्षण संस्था पांजरपोळ, वेल्हाळे येथे ठेवण्यात आले आहेत. गोरक्षक अविनाश शाह यांच्या प्रयत्नांनी कारवाई करण्यात आली.

संगमनेर शहरात, उपनगरात असणाऱ्या अवैध कत्तलखान्यांमधून गोवंश हत्या सर्रासपणे होत असल्याचे नेहमीच उघड झाले आहे. वेळोवेळी या ठिकाणी पोलिसांनी कारवाया केल्या आहेत. कूरण, निमोण, जमजम कॉलनी, जोर्वे रोड, कोल्हेवाडी रोड या परिसरात पोलिसांनी आपले लक्ष केंद्रित केले असल्याने आजूबाजूच्या काटवनात कत्तलीसाठी आणून लपवून ठेवलेली जनावरे पोलिसांनी अनेक वेळा पकडली आहेत. त्यामुळे कत्तलखाना चालकांचे मोठे नुकसान होत आहे. यावर तोडगा काढत आता कत्तल करणाऱ्या कसायांनी खरेदी केलेली गोवंश जनावरे ग्रामीण भागात ठेवण्याचा सपाटा लावला असून ग्रामीण भागात ही जनावरे नेमकी शेतकऱ्यांची की इतर कोणाची हे ओळखू येत नसल्याने त्याचा फायदा कत्तल करणाऱ्या कसायांना होत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!