दरोड्याच्या तयारीत असलेले सहा जण पकडले ; तीन जण पसार
प्रतिनिधी —
मोटार सायकल वर येऊन अहमदनगर ते सोलापूर रोडवर वाळूज बायपासच्या लगत अंधारामध्ये थांबून कुठेतरी दरोडा घालण्याच्या तयारीत असलेली दरोडेखोरांची टोळी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली आहे. यामध्ये सहा आरोपींना ताब्यात घेण्यास घेण्यात आले असून तीन आरोपी फरार झाले आहेत.
भरत विलास भोसले, रावसाहेब विलास भोसले, अजिनाथ विलास भोसले (तिघेही राहणार हातोळण, तालुका आष्टी, जिल्हा बीड) बबलू रमेश चव्हाण (वय 24 राहणार परिते, तालुका माढा, जिल्हा सोलापूर) कानिफ कल्याण भोसले (वय 20 राहणार पारोडी, तालुका आष्टी, जिल्हा बीड) अमित छगन काळे (वय 24 राहणार अंतापुर, तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर) असे पकडण्यात आलेल्या सहा जणांचे नावे असून कान्ह्या उर्फ कानिफ उद्धव काळे (राहणार वाकी, तालुका आष्टी, जिल्हा बीड) कृष्णा विलास भोसले (राहणार हातोळण, तालुका आष्टी, जिल्हा बीड) विनोद जिजाबा भोसले (राहणार चिखली, तालुका आष्टी, जिल्हा बीड) हे तिघेजण फरार झाले आहेत.
सदर संशयित आरोपींच्या ताब्यातून एक तलवार, एक सुरा, दोन लोखंडी कटावण्या, लाकडी दांडा, मिरची पूड, मोबाईल, दोन मोटार सायकल असा एकूण 1 लाख 60 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यातील सर्वच आरोपींवर विविध ठिकाणी अनेक वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यातील एक आरोपी भरत भोसले याच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार दत्तात्रय गव्हाणे, सचिन अडबल, संतोष खैरे, फुरकान शेख, रंजीत जाधव, रोहित मिसाळ, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, मच्छिंद्र बर्डे, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, भाग्यश्री भेटे, उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
पोलीस कॉन्स्टेबल अमोल कोतकर यांच्या फिर्यादी वरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.