‘बिग हिट मीडिया’ म्युझिकल लेबलचे लॉन्चिंग !
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
आधुनिक काळातील विविध भारतीय भाषांमधील गाण्यांची वाढती मागणी विचारात घेऊन हृतिक मणी आणि अनुष्का सोलवट यांनी एकत्रित येऊन बिग हिट मीडिया हे म्युझिक लेबल लाँच केले आहे.

संगीताचे आणि मानवाचे अनोखे नाते आहे. विविध प्रकारच्या संगीताने, गाण्यांनी मानवी जीवन समृद्ध, आनंदी केले उन आहे. जगातील सर्वच देशांमध्ये, सर्व समाजामध्ये संगीताचे महत्व अनन्यसाधारण आहे.
आपल्या भारत देशातील विविध भाषांमध्ये संगीताने गाण्यांनी संपूर्ण जगाला भुरळ पाडले आहे. आधुनिक युगामध्ये वाढत्या सोशल मीडियामुळे व अन्य साधनांमुळे संगीताची, गाण्यांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे मागणी जोरात वाढत आहे. मनोरंजक कथानक असलेले हे काही मिनिटांचे व्हिडिओ लाखो लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

कार्यक्रमाप्रसंगी प्रसिद्ध संगीतकार प्रशांत नाकटी, गायिका सोनाली सोनवणे, कलाकार विशाल फाटे, वैष्णवी पाटील, निक शिंदे, रितेश कांबळे, हर्षा मनी व चित्रपट व संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

सध्या, या म्युझिक लेबल कडे विविध भारतीय भाषांमधील गाण्यांची प्रभावी लाइनअप आहे. स्वतःचे म्युझिक लेबल लाँच करण्याविषयी ची उत्सुकता व्यक्त करताना हृतिक मणी म्हणतात, “अनुष्का आणि मी बऱ्याच काळापासून यावर काम करत आहोत आणि आम्हाला आनंद आहे की आम्ही हे लेबल लाँच करत आहोत. म्युझिक लेबल सुरू करणे तितके सोपे नाही, परंतु एकत्रितपणे, आम्ही संपूर्ण संगीत क्षेत्रामध्ये नव्या पिढीचं योगदान देऊ शकतो.मला खात्री आहे की आमचे प्रकल्प तुम्हा सर्वांना आनंद देतील.”

हृतिकप्रमाणेच अनुष्का सोलवट ही म्युझिक लेबल लाँच करण्याबाबत उत्सुक आहे. ती म्हणते, “मला खरोखर आनंद आहे की, कित्येक महिन्यांच्या संघर्षानंतर, आम्ही आमचे स्वतःचे लेबल सुरू करू शकलो. मी आणि हृतिकने आमच्या कुटुंबीयांच्या आणि मित्रपरिवाराच्या मदतीने आमचे सर्वोत्तम पाऊल पुढे टाकले आहे. आमच्यासोबत ज्या प्रकारचे कलाकार आणि गायक आहेत ते प्रेरणादायी आहेत आणि त्यासोबत मी एवढेच म्हणेन की पुढे नियोजित प्रकल्प नक्कीच आपल्याला वेगळ्या भावना , आनंद आणि अनुभव देतील.”

बिग हिट मीडिया हे भारतीय संगीत क्षेत्रातील एक उदयोन्मुख संगीत लेबल आहे आणि त्यात अनुभवी उद्योग व्यावसायिकांचा समावेश आहे. ज्यांना संगीताची आवड आहे आणि जे त्यांच्या कार्यात समर्पित आणि सर्जनशील आहेत. विविध भारतीय भाषांमधील भारतीय संस्कृतीच्या संस्कृतीची विविध रूपे दाखवणारी लोकप्रिय गाणी घेऊन ती उपलब्ध विविध समाज माध्यमातून भारतासोबतच जगातील विविध देशातील लोकांसमोर आणणे हे त्यांचे ध्येय आहे. कारण ते त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत सर्वोत्तम संगीत पोहोचविण्यासाठी आपल्या टीमसह काम करण्याची इच्छा बाळगून आहेत.
जर तुम्ही संगीतप्रेमी आणि करमणुकीचे शौकीन असाल आणि सर्वोत्तम संगीत शोधत असाल तर बिग हीट मीडिया तुमच्यासाठी जबरदस्त प्रोजेक्ट घेऊन येत आहे.

