अजिंक्य कला व क्रीडा मंडळ आयोजित बाल संस्कार शिबिराचा समारोप

प्रतिनिधी —
अकोले येथील अजिंक्य कला व क्रीडा मंडळ आयोजित बाल संस्कार शिबिराचा समारोप समारंभ उत्साहात पार पडला. आखीव, रेखीव पद्धतीने आणि पूर्ण नियोजनाने घेतलेल्या शिबिराचा तितक्याच समर्पक पद्धतीने अकोले येथे समारोप एका छोटेखानी कार्यक्रमाद्वारे करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दिलीप शहा (संचालक, हिंदसेवा मंडळ, अकोले विभाग ) यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे राजेंद्र भाग्यवंत होते. अध्यक्षीय सूचना स्मिता मुंदडा यांनी मांडली व अनुमोदन जयश्री मुंदडा यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ओघवत्या शैलीत डॉ. उमा कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविक डॉ. निरजा कुलकर्णी यांनी केले. प्रस्ताविकात त्यांनी मुलांवर संस्कार होणेचे दृष्टीने अत्यंत विचारपूर्वक नियोजन केल्याचे सांगितले. या शिबिरात मुलांना प्रार्थना, नेहमीचे परिचित श्लोक याचबरोबर मूळ भारतीय खेळ, चित्रकला, गायन, टाकाऊ कागदापासून वेगवेगळ्या कलाकृती तयार करणे, गोष्टी सांगणे इत्यादी उपक्रम करून घेण्यात आले. जेष्ठ सदस्य विनायक दैवज्ञ यांनी अजिंक्यचा गत इतिहास थोडक्यात सांगून, प्रशिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक करून, मंडळाचे वतीने कृतज्ञताही व्यक्त केली. प्रशिक्षणार्थिना मंडळाचे सदस्य नितीन बाणाईत आणि राजेंद्र देशमुख यांच्याकडून अल्पोपहार वाटण्यात आला. सोनल मालवणकर यांनी आभार प्रदर्शन केले. मॉडर्न हायस्कुल स्थानिक स्कुल कमिटी चेअरमन दिलीप शहा, खराटे सर, कचरे सर, भाग्यवंत सर, संभाजी भिंगारे, हेमंत नवले यांचे विशेष आभार मानण्यात आले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. उमा कुलकर्णी, डॉ. निरजा कुलकर्णी, सोनल मालवणकर , आशाताई बापट, स्मिता मुंदडा, जयश्री मुंदडा, रेखा धर्माधिकारी आणि सतीश मालवणकर यांनी कठोर परिश्रम घेतले.
या समारोपसाठी अजिंक्यचे अरुण रुपवते, हेमंत दराडे, राजेंद्र राठोड, प्रतीक मुंदडा, नितीन बाणाईत हे आवर्जून उपस्थित होते.
