हा तर मराठा समाजाचा अवमान — रूपाली थोरात

पालकमंत्री विखे पाटील यांच्या वडगाव पान येथील भूमिपूजन समारंभावर टीका

प्रतिनिधी —

मराठा आरक्षणाच्या संदर्भाने गाव बंदी असताना योजनांचे भूमिपूजन समारंभ करण्यास येणे हा समाजाचा अवमान असल्याचा आरोप वडगाव पान ग्रामपंचायतीच्या सदस्या रूपाली थोरात यांनी केला आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यातील वडगाव पान गावच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्याचा कार्यक्रम रविवारी सायंकाळी केला. या कार्यक्रमासंदर्भात उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत असून विखे पाटील यांनी इतरांच्या कामाचे श्रेय घेऊ नये असा आरोप करीत मराठा आरक्षण संदर्भात राजकीय नेत्यांना गावबंदी असताना विखे पाटील असे कार्यक्रम घेऊन मराठ्यांचा अपमान करीत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य रूपाली थोरात यांनी केला आहे

यशोधन संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून पाठवण्यात आलेल्या प्रेस नोट मध्ये त्यांनी म्हटले आहे की, वडगाव पान मधील विविध विकास कामांकरिता आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध झाला आहे. मात्र कोणताही संबंध नसताना फक्त राजकीय उद्देश ठेवून वडगाव पान मध्ये सत्ताधारी भाजपचे मंत्री हे उद्घाटनास आले. खरे तर गाव बंदी आहे. सर्वत्र अशांतता आहे. असे असताना जाणीवपूर्वक मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचे काम सत्ताधारी मंत्री आणि त्यांचे समर्थक करत आहेत. यांना जनता कधीही माफ करणार नाही अशा तीव्र शब्दात ग्रामपंचायत सदस्य रूपाली थोरात यांनी निषेध व्यक्त केला.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग संगमनेर यांच्या जलजीवन मिशन अंतर्गत वडगाव पान नळ पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजनाचा समारंभ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी पार पडला. या कार्यक्रमावरून वरील टीका टिपण्या सुरू झाल्या आहेत. या कार्यक्रमासाठी स्थानिक आमदार बाळासाहेब थोरात यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. प्रसिद्धीस दिलेल्या निमंत्रण पत्रिकेमध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांचे देखील नाव टाकण्यात आले होते. मात्र बाळासाहेब थोरात आमदार थोरात व त्यांचे समर्थक या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून गैरहजर राहिले असल्याचे दिसून आले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!