संगमनेर महाविद्यालयात माँ साहेब जिजाऊ आणि
स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
प्रतिनिधी —
संगमनेर महाविद्यालयात राजमाता माँ साहेब जिजाऊ व युग प्रवर्तक स्वामी विवेकांनद यांच्या जयंती निमित्त कोविड १९ च्या नियमांचे पालन करीत प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी भूगोल विभाग प्रमुख प्रा.आर.डी.गायकवाड, ग्रंथपाल डॉ.बी.व्ही.चव्हाण, महाविद्यालयाचे प्रबंधक संतोष फापाळे, कार्यालय लेखापाल संजय महाले, विजय पाटील, दिपक पवार व भानुदास सोनवणे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतान प्रो.डॉ.अरुण गायकवाड म्हणाले की, आई म्हणजे प्रेम, आपुलकी, त्याग, सहनशीलता, प्रेरणा, जिद्द, संयम व सामर्थ्य यांचा संगम आहे. या सर्व गुणांचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ साहेब होय. त्यांनी केवळ एका आईची भूमिका न निभावता शिवाजी राजांना राजकारण, समान न्याय आणि अन्याय करणा-यांवर कठोर शिक्षा देण्याचे धैर्य त्यांच्यात निर्माण केले.
तसेच स्वामी विवेकांनदांचे विचार सर्व युवकांसाठी प्रेरणादायी असून त्यांनी भारतीय संस्कृतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करुन दिली. तसेच सत्याला जाणण्याचे मार्ग आणि धर्म वेगवेगळे असले तरी सर्व धर्माचे सारतत्व एकच आहे हे स्वामी विवेकानंदानी ठामपणे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रबंधक संतोष फापाळे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार विजय पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक व शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते.
