पेमगिरी किल्ल्याच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू – रणजितसिहं देशमुख
राष्ट्रीय छावा संघटनेकडून शहागडावर राजमाता जिजाऊ याची जयंती उत्सा हात साजरी.
प्रतिनिधी —
राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना घडवले. त्यामुळे सदैव पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी अशी आदर्श माता घराघरात जन्माला यायला हवी. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे व राजमाता जिजाऊ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक अशा शहागड किल्ल्याच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू असे प्रतिपादन महानंदा व राजहसं दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यानी केले.
राष्ट्रीय छावा संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण कानवडे यांच्या पुढाकारातून संगमनेर तालुक्यातील शहागडावर राजमाता जिजाऊ जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना देशमुख बोलत होते. याप्रसंगी स्वामी विवेकानंद, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, हरित क्रांतीचे प्रणेते आण्णासाहेब शिदें यानाही जयंतीनिमित्त उपस्थितानी अभिवादन केले.
देशमुख म्हणाले की, आज सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची जयंती देखील आहे. संगमनेर तालुक्याच्या जडणघडणीत त्याचा मोठा वाटा आहे. एक निर्भीड आणि सडेतोड असे व्यक्तिमत्व सहकाराची गंगा तालुक्यांमध्ये उभी करून तालुक्यातील हजारो लोकांना विकासाच्या संधी उपलब्ध करुन दिल्या. दुष्काळी तालुका अशी ओळख असलेला संगमनेर तालुका आज सुजलाम – सुफलाम दिसतो आहे, तो दादांच्या प्रयत्नामुळेचं असे म्हणून या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य असल्याचे शेवटी देशमुख म्हणाले आहेत.
या कार्यक्रमासाठी सोमनाथ गोडसे, विलासराव कवडे, रावसाहेब डुबे, जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक नानासाहेब कानवडे, संभाजी हासे, उमेश बैचे, खंडू सातपुते, जिल्हा संपर्कप्रमुख दिनकर घुले, तालुका अध्यक्ष गणेश गुंजाळ, उपाध्यक्ष अजय गुंजाळ, बाळासाहेब कानवडे, कार्याध्यक्ष अण्णासाहेब गवांदे, राधेश्याम घुले सतीश कानवडे, अण्णासाहेब शेलकर, सरपंच द्वारकाताई डुबे, उपसरपंच खंडू जेडगुले, सचिता घुले, अर्चना वनपत्रे, सर्व सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.
येथुन पुढे दरवर्षी शहागड किल्ले पेमगिरी या ठिकाणी सिंदखेडराजा सारखाच जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती प्रविण कानवडे यांनी दिली.
