लम्पी स्किन आजाराच्या निवारणासाठी राज्य सरकार सतर्क — पशुसंवर्धन मंत्री विखे पाटील

पशुधनासाठी आतापर्यंत १७० कोटी रुपये खर्च

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

लम्पी स्कीन आजाराच्या निवारणासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची माहिती दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

सध्या राज्यातील पशुपालक चिंतेत आहेत. कारण पुन्हा जनावरांनी लम्पी स्कीन आजाराची लागन होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झालं आहे. लम्पी स्कीन निवारणासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले असून पशुधनासाठी शासनाने आतापर्यंत १७० कोटी रुपये खर्च केल्याचे ते म्हणाले.

गेल्या काही महिन्यांपासून अहमदनगर जिल्ह्यात २३९ गावात १ हजार १७४ जनावरांना लम्पीची लागण झालेली आहे. त्यातील १९ जनावरे गंभीर अवस्थेत असून ५३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. राहुरी, शेवगाव, पाथर्डी, कोपरगाव तालुक्यात लम्पीचे प्रमाण वाढते आहे. शेतकर्‍यांनी, पशुपालकांनी गोठे स्वच्छ ठेवून कीटकनाशकांची फवारणी करावी, पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

लम्पी निवारणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. लम्पी आजारासाठी लागणाऱ्या मदतीसाठी शासन सदैव शेतकऱ्यांशी पाठीशी असल्याचे विखे पाटील म्हणाले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती आणि हर घर जल या योजनेत अहमदनगर जिल्हा आघाडीवर असल्याचे विखे पाटील म्हणाले. दरम्यान, ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात येणाऱ्या सर्वांसाठी जांभळाचे रोप भेट देण्यात आले आहे, प्रत्येकानं त्यांचे संगोपन करावे, असे आवाहनही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!