चार वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध 

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या (AHTU) पथकाची यशस्वी कारवाई

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

सुमारे चार वर्षांपासून तपासावर असलेल्या अपहरणाच्या गुन्ह्याचा छडा लावत अहिल्यानगर येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (AHTU) अपहृत अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात यश मिळविले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर २०२२ रोजी खंडू गहिनाथ पालवे (रा. मोहरी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) याने एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ८९६/२०२२ अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३ व ३६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा दीर्घकाळ तपास लागला नसल्याने तो पुढील तपासासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU), अहिल्यानगर यांच्याकडे वर्ग करण्यात आला. तसेच तपासादरम्यान भारतीय दंड संहितेचे कलम ३७० हे वाढीव कलमही लागू करण्यात आले.

पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली AHTU पथकाने विविध माध्यमांतून, तसेच गुप्त बातमीदारांच्या सहाय्याने सातत्याने शोधमोहीम राबविली. या प्रयत्नांना यश येत संबंधित अपहृत मुलगी सापडल्यानंतर तिला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पाथर्डी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण शिंदे तसेच AHTU पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!