श्री संत जनार्दन स्वामी विद्यालय व जुनिअर कॉलेज येथे महामानवांची जयंती व पुण्यतिथी साजरी
प्रतिनिधी —
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व बाळ गंगाधर टिळक यांची जयंती विद्यालयामध्ये साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे थोरात एस.के. होते.

या निमित्ताने विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये जवळ पास ३४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेसाठी ‘पाणी वाचवा पृथ्वी वाचवा’ “सोशल मीडियाचा वापर चांगला की वाईट?” “माझी शाळा माझा आनंद’ असे विविध विषय स्पर्धेसाठी देण्यात आले होते.

विद्यार्थ्यांनी अतिशय मनोरंजक व आकर्षक पद्धतीने आपली भाषणे सादर केली. त्यामध्ये मोठ्या गटात कु. साक्षी बाबासाहेब थोरात व कु.वर्षा खुळे यांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला. मध्यम गटात प्रथम क्रमांक कु. पूर्वी खोले इयत्ता आठवी हिला मिळाला तर छोट्या गटांमध्ये प्रथम क्रमांक कु. वर्षा खुळे हिला मिळाला.

तसेच द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढण्यात आले. विद्यालयाचे व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्रीकांत माघाडे यांनी विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात थोरात यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन थोरात के.जे. व भालेराव पी.एम. यांनी केले वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून काशीद के .बी. सातपुते ए.बी. कांचन हासे यांनी गुणदान केले.
अशोक गुंजाळ, कोल्हे एन.बी., तुरकणे ए.आर भालेराव आर. एन., अरुण वामन, हर्षल कोल्हे, शंकर शिंदे, शहाबाई गाडे, प्रतीक्षा राहणे, लांडगे, ज्युनिअर कॉलेजचे अरुण पानसरे, मयूरी शिंदे, देवकर, वर्पे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

