माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार रखडले !

शिक्षक भारती संघटनेचा आंदोलनाचा इशारा !

प्रतिनिधी —

तीन महिन्यापासून जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार रखडले असून ते शासनाच्या निर्णयाप्रमाणे राष्ट्रीयकृत बँकेत एसजीएसपी योजनेअंतर्गत पगार करावेत असे निवेदन शिक्षक भारती संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना देण्यात आले होते. परंतु शिक्षण अधिकाऱ्यांनी वेगळा निर्णय घेत सदर पगार हे जिल्हा बँकेत व्हावेत असे आदेश दिले असल्याने शिक्षकांचे पगार रखडले आहेत. त्यामुळे हे पगार लवकरात लवकर करावे अशी मागणी शिक्षक भारती या संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, तीन महिन्यापासून  शासन निर्णयाप्रमाणे राष्ट्रीयकृत बँकेत एस.जी.एस.पी. योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार करावे असे निवेदन शिक्षक भारती संघटनेने शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना दिले होते.

गेल्या दोन वर्षांपासून सदर पगार राष्ट्रीयकृत बँकेत होत होते. परंतु अहमदनगर जिल्ह्यातील  शिक्षणाधिकारी यांनी तुघलकी आदेश देऊन सदर पगार हे जिल्हा बँकेत व्हावेत असे आदेश दिले. शिक्षक भारती संघटनेने पुणे येथे वरिष्ठ कार्यालयात पाठपुरावा करून शिक्षण उपसंचालक यांचा आदेश असूनही शिक्षणाधिकारी यांनी तो मान्य केला नाही.

संबंधित काळात एकमेव शासनमान्य शिक्षक संघटना शिक्षक भारती यांनी निवेदन देऊन जर कर्मचाऱ्यांना काही झाले तर ४० लाख अपघाती विमा स्वतः शिक्षणाधिकारी यांनी द्यावा असे सांगितले होते. परंतु ते झाले नाही. नेवासा तालुक्यातील श्री घोडेश्वरी विद्यालय, घोडेगाव येथील भाऊसाहेब तुळशीराम बर्डे यांचे काल अपघाती निधन झाले. ते सदर एसजीएसपी योजने अंतर्गत लाभ मिळण्यास पात्र होते. पगार काहीही न कळवता बंद केले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला  शिक्षणाधिकारी यांनी ४० लाख अपघाती विमा भरपाई द्यावी. तसेच जुलै महिना संपत आलेला असताना देखील  २० टक्के, ४० टक्के अनुदानित महाविद्यालयांचा पगार झालेला नाही.

जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील फरकही मिळालेला नाही. याबाबत तातडीने निर्णय घेण्याचे संघटनेने म्हटले आहे. वेळेत निर्णय घेतला नाही तर शिक्षक भारती संघटना संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून तीव्र आंदोलन करणार आहे. असे शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे, कार्याध्यक्ष डॉ.किशोर डोंगरे, सरचिटणीस महेश पाडेकर, राज्य सचिव सुनील गाडगे, माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, तालुकाध्यक्ष प्रा. मनोहर राठोड, उपाध्यक्ष प्रा. सुशांत सातपुते, विजय कराळे, संजय भुसारी आदींनी संघटनेच्या वतीने इशारा दिला आहे.

या मागणीला उपाध्यक्ष सचिन जासूद, उपाध्यक्ष दादासाहेब कदम, सहसचिव संतोष निमसे, महिला अध्यक्षा रूपाली कुरुमकर, अमोल चंदनशिवे, माफीज इनामदार, योगेश देशमुख, सुमंत शिंदे, श्रीरामपूर महिला तालुकाध्यक्ष कल्पना चौधरी, योगेश पाटील, चंद्रशेखर हासे, संपत वाळके, संजय भालेराव, गणपत धुमाळ, कैलास रहाणे, रूपाली बोरुडे, नेवासा महिला तालुकाध्यक्ष उषा मिसाळ, सचिन लगड, श्याम जगताप, संजय तमनर, चंद्रशेखर हासे, प्रवीण मते, मारुती कुसमुडे, मनोहर राठोड, प्रवीण आहेर, सोमनाथ खाडे अमोल वर्पे, हर्षल खंडीझोड, संदीप तोगे, बाबासाहेब चौधरी,  जालिंदर पटारे, बबन भोसले, नानासाहेब खराडे, हरिश्चंद्र पंडित, नितीन शिरसाट आदी पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!