जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत संगमनेरचे वर्चस्व !

एकवीस सुवर्णसह बावन्न पदके; अहमदनगरने पटकाविले दुसरेस्थान

प्रतिनिधी —

अहमदनगर जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशनने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत संगमनेरच्या योगासन खेळाडूंनी आपले वर्चस्व कायम राखले. मालपाणी लॉन्सवर पार पडलेल्या या स्पर्धेत शालेय विभागात स्पर्धेच्या चारही प्रकारांमध्ये नेत्रदीपक प्रदर्शन करतांना संगमनेरच्या खेळाडूंनी २१ सुवर्ण पदकांसह १८ रौप्य व १३ कांस्य अशा एकूण ५२ पदकांची लयलुट केली. तीन सुवर्ण पदकांसह पाच पदके मिळवणार्‍या अहमदनगरच्या खेळाडूंनी दुसरे तर एका रौप्यप्यसह तीन कांस्य पदके मिळवणार्‍या कोपरगावने  तिसरे स्थान पटकाविले.

विजेत्या स्पर्धकांना आमदार सत्यजीत तांबे, महाराष्ट्र व अहमदनगर जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, उद्योजक गिरीश मालपाणी, पृथ्वीराज थोरात, पतंजली योगपीठाचे जिल्हाध्यक्ष उदयभान, संगमनेर मर्चन्ट्सचे अध्यक्ष संतोष करवा, जिल्हा असोसिएशनचे उपाध्यक्ष कुलदीप कागडे, सेके्रटरी उमेश झोटींग, तांत्रिक विभागाच्या सहसचिव प्रणिता तरोटे व बाळासाहेब गवते यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!