राधाकृष्ण विखेंच्या संस्थेला झाकीर नाईककडून ५ कोटींची मदत !

एनआयएने गुन्हा दाखल करून कारवाई करावी — संजय राऊत

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

शिंदे – फडणवीस सरकार मध्ये महसूल मंत्री असलेले विखे – पाटील यांच्या कारखान्यांची प्रकरणे अत्यंत गंभीर आहेत. राष्ट्रद्रोहाचा आरोप असणाऱ्या झाकीर नाईक कडून विखे – पाटील यांच्या संस्थेला साडेचार ते पाच कोटी रुपयांची मदत देण्यात आली. याप्रकरणी एनआयए गुन्हा दाखल करून कारवाई केली पाहिजे. अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी केली.

तामीळनाडू सरकारमधील मंत्र्यांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मुंबईत पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी महसूलमंत्री विखे-पाटील यांच्या संस्थेला झाकीर नाईकडून कोट्यवधी रुपयांची मदत मिळाल्याकडे लक्ष वेधले. झाकीर नाईकसंदर्भात इतरांना अटक करता. नवाब मलिक यांच्यावर कारवाई केली जाते. मग राष्ट्रद्रोहाचा आरोप असणाऱ्या झाकीर नाईककडून आर्थिक मदत घेणाऱ्या विखे-पाटील यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा सवाल संजय राऊत यांनी केला. लवकरच विखे-पाटील यांच्या कारखान्यातील गैरकारभाराचा भंडाफोड करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!