आश्वी खुर्द सोसायटीच्या आठ संचालकांचे राजीनामे ?

प्रतिनिधी —

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या आश्वी खुर्द येथील विविध सेवा सहकारी सोसायटीतील ८ संचालकांनी पदाधिकारी चेअरमन यांच्यावर नाराजी व्यक्त करीत राजीनामे दिले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सोसायटीचे चेअरमन निर्णय घेताना विश्वासात घेत नसल्याचे या संचालकांचे आरोप असून सदर चेअरमन मनमानीने कारभार करतात असे त्यांचे म्हणणे आहे. ही सोसायटी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांच्या ताब्यात असल्याचे बोलले जाते.

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात जुन्या व ऐतिहासिक अशी ओळख असलेल्या संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल सेवा सहकारी सोसायटीला नुकतीचं १११ वर्ष झाले असून सेवा सोसायटीचा कारभार सुरळीत आहे. मात्र मागील काही दिवसापासून समाजमाध्यमात सेवा सोसायटीच्या आठ संचालकानी राजीनामे दिले असल्याचे पत्र व्हायरल होत असल्याने संचालकासह सभासदामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

आश्वी खुर्द येथिल सेवा सहकारी सोसायटी ही जिल्ह्यातील सर्वात जुनी सोसायटी म्हणून जिल्ह्यात सुप्रसिध्द असून या सेवा सोसायटीच्या पारदर्शक कारभाराचा जिल्ह्यात मोठा लौकीक आहे. मात्र मागील दोन ते तीन दिवसापासून सेवा सोसायटीच्या आठ संचालकानी आपल्या पदाचे राजीनामे दिले असल्याचे एक पत्र समाजमाध्यमात मोठ्या प्रमाणात वायरल झाल्याने मोठे तर्क वितर्क लढवले जात आहे. या पत्रात संचालकानी अनेक गंभीर आरोप करत राजीनामे दिले. असले तरी प्रत्यक्षात मात्र कोणीही याबाबत कोणताही खुलासा करायला तयार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हे पत्र खरे की खोटे याबाबत कोणताही उलगडा होत नसल्याने नागरीकानमध्ये जोरदार कुजबुज सुरु आहे.

दरम्यान या पत्राबाबत सेवा सोसायटीचे सचिव बाळासाहेब गायकवाड यांनी असे कोणतेही पत्र आम्हाला मिळाले नसल्याचे सांगितले असून संचालकानी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिल्याने संचालकांचा राजीनामा आणि पदाधिकाऱ्यांची मनमानी याबाबत जोरदार उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!