माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आ. सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नांतून कोकणगाव तुळजाभवानी मंदिरासाठी २० लाखांचा निधी

संगमनेर | प्रतिनिधी

महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यामुळे संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील तुळजाभवानी माता मंदिराच्या सभामंडपासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती प्रसिद्धी विभागाकडून देण्यात आली आहे. या कामाचा नुकताच शुभारंभ हरिभक्त परायण भागवत बाबा यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी सरपंच आशाताई जोंधळे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शिवाजी जोंधळे, उपसरपंच दिलीप जोंधळे, ॲड. सुरेश जोंधळे, पोपट थोरात, मधुकर पवार, संभाजी जोंधळे, डॉ. दत्तात्रय जोंधळे, नानासाहेब वायकर, हनुमंत जोंधळे, मारुती जोंधळे, बाबासाहेब वायकर, बाबू नाना वायकर, दिगंबर जोंधळे, तुकाराम जोंधळे, नवनाथ वायकर, कचरू जोंधळे, सुरेश वायकर, विलास जोंधळे, सचिन वायकर, रहीमपूरचे पोलीस पाटील आबासाहेब शिंदे, बाबासाहेब शिंदे, बंटी वायकर, पप्पू वायकर तसेच अभियंता जोंधळे, अभियंता शिंदे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आभार प्रदर्शन शिवाजी जोंधळे यांनी केले.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!