संगमनेर मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येचा निषेध !

प्रतिनिधी —

संगमनेर तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने राजापूरचे (कोकण) पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येच्या निषेधार्थ तहसीलदार संगमनेर यांना निवेदन देण्यात आले.

राज्यभरात पत्रकारांवर सुरू असणाऱ्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, मयत शशिकांत वारीशे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात यावी व हा खटला जलद गती न्यायालयात चालवावा अन्यथा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर व सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली यापुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी अध्यक्ष शेखर पानसरे तसेच आनंद गायकवाड, गोरक्षने नेहे, संदीप इटप, श्याम तिवारी, निलिमा घाडगे, गोरक्ष मदने, सचिन जंत्रे, अमोल मतकर, योगेश आसोपा उपस्थित होते.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!