श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन 

प्रतिनिधी —

शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाचे या शैक्षणिक वर्षातील वार्षिक स्नेहसंमेलन मंगळवार दि. २० ते २४ डिसेंबर २०२२ या कालावधीत होत आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड व कलामंडळ कार्याध्यक्ष प्रा. रंजना सानप यांनी दिली.

या निमित्ताने गीतसंध्या, नृत्याविष्कार,मेहंदी स्पर्धा, पुष्परचना स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, शेलापागोटे,कला,वाणिज्य व विज्ञान प्रश्नमंजुषा,शिक्षकांसाठी क्रिकेट मॅच,शिक्षिकांसाठी संगीत खुर्ची,पथनाट्य,विविध वेशभूषा इत्यादी कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.

स्नेहसंमेलनाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार दि. २३ डिसेंबर २०२२ रोजी साईबाबा सभागृहात होईल. याप्रसंगी प्रमुख अतिथी माध्यमिक शिक्षणाधिकारी  अशोक कडूस, प्रमुख उपस्थिती सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक श्रीराम थोरात उपस्थित राहणार आहेत. तर अध्यक्षस्थान सीए नारायण कलंत्री भूषविणार आहेत.

तसेच शालेय समिती सदस्य नंदनवन बाफना, श्रीहरी नावंदर,  संतोष करवा आदी उपस्थित राहणार आहेत. स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य गायकवाड, उपप्राचार्य डॉ.राजेंद्र ढमक, पर्यवेक्षक प्रा.अप्पासाहेब गुंजाळ, श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी प्रयत्नशील आहेत.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!