काम करायचे नसेल तर खुर्च्या अडवू नका — आमदार डॉ. किरण लहामटे
प्रतिनिधी —
भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायतस मितीच्या निवडणुकांत यश मिळवण्यासाठी जनतेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीध्येय धोरणे पोहोचवणे गरजेचे आहे. ज्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती लढवायची, त्यांना राष्ट्रवादी पक्षातनवचैतन्य निर्माण केल्याशिवाय यश मिळणे शक्य होणार नाही. तेव्हा राष्ट्रवादीत ज्यांना काम करावे असे वाटत नाही, त्यांनी खुर्च्या अडवून न बसता त्या मोकळ्या कराव्यात, असा इशारा वजा आदेशच राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी राष्ट्रवादीच्या कामचुकार पदाधिकाऱ्यांना दिला.

आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला त्या मेळाव्याच्या प्रसंगी ते बोलत होते यावेळी त्यांनी पक्षात विविध पदावर राहून देखील काम सुखारपणा करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना चांगलेच झाडले तसेच काम न करता जर खुर्च्या अडवून धरायचे असतील तर त्या खुर्च्या मोकळ्या कराव्यात व नवीन कार्यकर्त्यांना संधी द्यावी असे मतही व्यक्त केले

ज्यांच्याकडे पदे पण ते पक्षाचेकाम करताना दिसत नाहीत, त्यांना डिसेंबरमधेच सजग होऊन निष्ठेने पक्षात सक्रिय काम दाखवावे लागेल, नाहीतरवपदेतरी सोडावी लागतील. आजच्या शिबिरास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायला हवे होते मात्र कार्यकत्यांचे सोडा पण पदाधिकारी सुद्धा आजच्या कार्यकर्ता शिबीरास उपस्थित राहिलेले नाहीत, हीबाब चिंताजनक असल्याचे ते म्हणाले.

अकोल्यातील महाराजा लॉन्सवर खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘वेध भविष्याचा, विचार राष्ट्रवादीचा’ या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकदिवसीय कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अकोले तालुक्यात आमदार किरण लहामटे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला.नया शिबिरात आमदार डॉ. लहामटे बोलत होते.

शिबिरास बऱ्याच पदाधिकारी व कार्यकर्ते यांची अनुपस्थितीखटकली, या शिबिरास अगस्तिचे अध्यक्ष सीताराम गायकर, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्षे, जिल्हा उपाध्यक्ष सिताराम काकडे, रामदास ससे, वसंतराव मनकर आदी उपस्थित होते.

फक्त पदांसाठी राष्ट्रवादीत प्रवेश करून चालणार नाही. जे पदाधिकारी आहेत त्यांनीही याची जाणीव ठेवून ताबडतोब कामांना सुरुवात करा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राज्यात पक्ष सांभाळण्यास समर्थ आहेत. पण तालुक्यातून पक्षाचे नेटवर्कच नसेल तर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपण कसे काय निवडून येऊ, याचा विचार संभाव्य उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांनी करावा असे आवाहन आमदार लहामटे यांनी केले.

तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, विठ्ठलराव चासकर, अगस्तिचे उपाध्यक्ष अशोक भांगरे, जिल्हा बँक संचालक अमित भांगरे, पोपट दराडे, विकास शेटे, अमित नाईकवाडी, ईश्वर वाकचौरे, अनिल कोळपकर, आरिफ शेख, महिला तालुकाध्यक्ष स्वाती शेणकर, पुष्पलता लहामटे, सुनिता भांगरे, नीता आवारी, उज्वला राऊत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र कुमकर यांनी केले.

