एकत्र काम करून कामगार आणि सभासदांचे हित जोपासू — महसूलमंत्री विखे पाटील
विखे पाटील साखर कारखाना बॉयलर अग्नी प्रदिपन
प्रतिनिधी —
साखर कारखानदारी मध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढली असली तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साखर उद्योगास दिलेले प्रोत्साहन आणि यातील अडचणीवर वेळोवेळी केलेल्या उपाय-योजनामुळे येणाऱ्या काळात या उद्योगास स्थर्य प्राप्त होणार आहे. एकत्र काम करून कामगार आणि सभासदाचे हित जोपासू असा विश्वास महसुलमंत्री राधाकृष्ण विश्वे पाटील यांनी व्यक्त केला. केंद्रात आणि राज्यात शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार आल्याने हा गळीत हंगाम यशस्वी होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रवरानगर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ७३ व्या बॉयलर अग्नी प्रदिपन कार्यक्रमात विखे पाटील बोलत होते. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, बारामती तालुक्याचे भाजपा अध्यक्ष पाडुरंग कचरे, प्रवरा बँकेचे अध्यक्ष अशोकराव म्हसे, ट्रक सोसायटीचे अध्यक्ष नंदूशेठ राठी, उपाध्यक्ष सुनिल जाधव, भाजीपाला सोसायटी च्या अध्यक्षा गिता थेटे कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कडु, गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुंकूदराव सदाफळ, कार्यकारी संचालक अभिजित भागडे आदी उपस्थित होते.

केंद्रातील सरकारने साखर उद्योगासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. असे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की, येणारा गळीत हंगाम हा स्पर्धेचा असणार आहे. यामध्ये चांगले काम करा व्यवस्थापन आपल्या सोबत आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे सहकारी चळवळीच्या दृष्टीने सकारात्मक आहे. याचा निश्चित फायदा सहकारी चळवळीला होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आजपर्यत एकत्रितपणे काम करीत आव्हानांवर मात करून गळीत हंगाम यशस्वी केले. यंदाचा हंगामही निश्चित यशस्वी करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वाना चांगले आरोग्य लाभो अशा शब्दांत विजया दशमीच्या शुभेच्छा दिल्या. प्रारंभी संचालक रामभाऊ भुसाळ वच्छाला व भुसाळ, देवीचंद तांबे व सुशिला तांबे, सुभाष अंत्रे व नलिनी अंत्रे स्वप्नील निबे व वर्षा निबे यांनी बॉयलरची विधी पुजन केले. कामगारांच्या वतीने ज्ञानदेव आहेर यांनी महसूलमंत्री विखे पाटील यांचा सत्कार केला.

यावेळी संचालक कैलास नाना तांबे, डॉ. दिनकर गायकवाड, ॲड. भानुदास तांबे, दत्तात्रय खर्डे, संपत चितळकर, धनंजय दळे, दिलीप कडू दादासाहेब घोगरे, अण्णासाहेब म्हस्के, उज्वला घोलप, संगिता खर्डे, संजय आहेर, बाबुराव पलघडमल, सतीष ससाणे, दादासाहेब घोगरे, साहेबराव म्हस्के, अण्णासाहेब म्हस्के, दत्तात्रय खर्डे आदीसह सभासद कामगार उपस्थित होते.

