आमदार सत्यजीत तांबे 23 डिसेंबरपासून फिनलँडच्या अभ्यास दौऱ्यावर

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

महाराष्ट्र विधानमंडळातील एक अभ्यासू, दूरदृष्टी असलेले व प्रचंड जनसंपर्क असलेले लोकप्रतिनिधी म्हणून ओळख असलेले आमदार सत्यजीत तांबे हे सेंटर फॉर इंडिया इंटरनॅशनल रिलेशन्स या राष्ट्रीय संस्थेमार्फत 23 डिसेंबर पासून जगातील सर्वाधिक आनंदी देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, व शालेय शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या फिनलँड देशाच्या अभ्यास दौऱ्यावर रवाना होत आहेत अशी माहिती प्रसिद्धी विभागाकडून देण्यात आली आहे.

फिनलँड हा देश जगातील सर्वोत्तम शालेय शिक्षण व्यवस्थेसाठी ओळखला जातो. यासोबतच वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्समध्ये सातत्याने अव्वल क्रमांकावर असलेला हा देश सार्वजनिक धोरणे, मानवी विकास आणि प्रशासनाच्या दृष्टीने एक आदर्श मानला जातो.

एक आठवड्याच्या या अभ्यास दौऱ्यात शालेय शिक्षण व्यवस्था, पर्यावरण संरक्षण, औद्योगिकीकरण, आरोग्य व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छता, नागरीकरण तसेच पायाभूत सुविधा विकास या विविध विषयांचा सखोल अभ्यास केला जाणार आहे.

· नाशिक – पुणे हायस्पीड रेल्वेसंदर्भात महत्त्वपूर्ण अभ्यास

सध्या चर्चेत असलेल्या नाशिक – पुणे हायस्पीड रेल्वे महामार्गाच्या मार्गात जीएमआरटी (Global Monitoring Radio Telescope) चे कारण देऊन बदल करण्याचा प्रस्ताव मांडला जात आहे. फिनलँडमध्ये मात्र जीएमआरटी केंद्रांजवळून अनेक हायस्पीड रेल्वे मार्ग यशस्वीरित्या कार्यरत आहेत. या संदर्भातील तांत्रिक, पर्यावरणीय व धोरणात्मक बाबींचा अभ्यास या दौऱ्यात आमदार तांबे करणार असून, त्याचा नाशिक- पुणे संगमनेर मार्गे रेल्वे प्रकल्पाला सकारात्मक लाभ होण्याची शक्यता आहे.

· आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व

सेंटर फॉर इंडिया इंटरनॅशनल रिलेशन्स या जगभरातील विविध देशांशी समन्वय साधणाऱ्या संस्थेमार्फत आयोजित या अभ्यास दौऱ्यात देशभरातून निवडक सदस्यांचे शिष्टमंडळ सहभागी होणार असून, त्यामध्ये आमदार सत्यजीत तांबे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

विविध क्षेत्रांचा सखोल अभ्यास, आंतरराष्ट्रीय धोरणांची जाण आणि विविध भाषांवरील प्रभुत्व यामुळे आमदार तांबे यांची विधानमंडळातील अभ्यासू आमदार म्हणून राज्यभर ओळख आहे. यापूर्वीही त्यांनी विधानमंडळाच्या अभ्यास दौऱ्यांमधून विविध देशांना भेटी देऊन महत्त्वपूर्ण अनुभव आत्मसात केला आहे.

· राज्यातील सक्रिय भूमिका

उत्तर महाराष्ट्र विभागाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी विधान परिषदेत शिक्षण, कृषी, सहकार, बेरोजगारी, आरोग्य, विधी व न्याय व्यवस्था यासारख्या विषयांवर सातत्याने ठाम भूमिका मांडली आहे. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांना विधान परिषदेत तसेच राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

याशिवाय युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष म्हणून तसेच नेहरू युवा केंद्रच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात युवक कार्यकर्त्यांची सक्षम फळी उभी करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

नाशिक – पुणे रेल्वे महामार्गासाठी उपयुक्त अभ्यास

आंतरराष्ट्रीय रेडिओ केंद्र (जीएमआरटी) कारण देत नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. फिनलँडमध्ये जीएमआरटीजवळून हायस्पीड रेल्वे मार्ग कसे कार्यरत आहेत, याचा अभ्यास केल्याने संगमनेर मार्गे रेल्वे प्रकल्पाला तांत्रिक आधार मिळण्याची शक्यता आहे.

शालेय शिक्षण व्यवस्थेचा सखोल अभ्यास

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार सत्यजीत तांबे यांनी सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केवळ 68 शब्दांचा उल्लेख असल्याबद्दल तीव्र निषेध नोंदवला होता तसेच महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर स्पष्टपणे बोट ठेवले होते.

जगातील सर्वोत्तम शिक्षण मॉडेल असलेल्या फिनलँडचा अभ्यास केल्याने महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाला धोरणात्मक दिशादर्शन मिळणार आहे. अशी वरील माहिती प्रसिद्धी पत्रकार देण्यात आली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!