नाशिक – पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे आंदोलन पेटले !

अकोलेकर व सर्वपक्षीय नेत्यांचा संगमनेर प्रांत कार्यालयावर मोर्चा…

मंत्री विखे, थोरात, तांबे, खताळ, लहामटे, वाकचौरे, आमदार खासदारांचा डॉ. अजित नवले यांनी घेतला खरपूस समाचार

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

नाशिक – पुणे सेमी हॉस्पिटल रेल्वे देवठाण अकोले येथून संगमनेर मार्गे पुण्याकडे जाणार होती. तसाच प्रस्ताव आणि प्रकल्प मंजूर झाला होता. मात्र ही रेल्वे अचानकपणे शिर्डी मार्गे वळविण्यात आली. त्यामुळे नाशिक पुणे या सरळ मार्गावरील सर्वच गावातील जनता संतप्त झाली. लोकप्रतिनिधीही आक्रमक झाले. आणि पूर्वीच्याच मार्गावरून रेल्वे न्यावी यासाठी आंदोलने सुरू झाली. आता सर्वच लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे, आपापले राजकीय जोडे बाजूला ठेवावेत, कुठलीही बनवाबनवी न करता, लपवा छपवी न करता फक्त रेल्वे मूळ मार्गावरून कशी नेता येईल यासाठी संघर्ष करावा असे आवाहन अकोले तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी केले आहे.

अकोले तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी आणि जनतेने नाशिक पुणे रेल्वे अकोले संगमनेर मार्गेच न्यावी यासाठी आंदोलन सुरू केले. संगमनेर प्रांत अधिकारी कार्यालयावर यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. प्रांत अधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर या मोर्चात सर्वच नेत्यांनी आपापली मते मांडली.

आमदार खताळ यांच्या भाषणाचा संदर्भ देत कॉम्रेड डॉ. अजित नवले म्हणाले की, पालकमंत्री विखे पाटील म्हणतात ‘रेल्वे शिर्डी मार्गे कशी गेली हे मलाच माहीत नाही’ असे जर असेल तर मंत्रिमंडळातील त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा विश्वासघात केला आहे असे म्हणावे लागेल. कारण केंद्र आणि राज्य सरकार हे दोघे मिळून हा रेल्वे प्रकल्प करत आहेत. आणि जर पालकमंत्री विखे पाटील खरे बोलत असतील तर आता त्यांच्याच नेतृत्वाखाली सरकार विरोधात आंदोलन करण्यास आम्ही तयार आहोत. नाहीतर त्यांच्या संमतीशिवाय आणि त्यांना माहीत असल्याशिवाय रेल्वे शिर्डी वरून जाऊ शकत नाही. तुम्ही स्पष्टपणे जाहीररीत्या सांगा की, हा मार्ग तुम्हाला माहीत नसताना शिर्डी कडून वळवण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तुमच्या सहकारी मंत्र्यांनी तुम्हाला न विचारता हा निर्णय घेतला आहे असे आव्हान देत नवले म्हणाले की, ‘मी जरी कम्युनिस्ट असलो तरी या रेल्वेसाठी सरकारविरुद्ध आंदोलन करताना तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहे’.

कॉम्रेड नवले असेही म्हणाले की, माजी मंत्री थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी आता स्पष्ट भूमिका घेणे गरजेचे असून आमदार सत्यजित तांबेंवर ढकलून चालणार नाही. आमदार तांबे यांनी संयोजकाची भूमिका बजावत या मार्गावरील सर्व आमदार आणि खासदारांना एकत्रित करून हा सर्व लढा एकत्रितपणे लढायला हवा. आम्ही सर्व अकोलेकर तुमच्या सोबत खाण्याला खांदा लावून या आंदोलनात सक्रिय सहभागी राहू.

 विखे समर्थकांची चिडचिड…!

कॉम्रेड डॉक्टर अजित नवले यांनी मोर्चासमोर केलेल्या भाषणानंतर आणि सर्वच नेत्यांची झाडाझडती घेतल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक मात्र अस्वस्थ झाले. त्यांनी आपली खदखद आणि चिडचिड सोशल मीडियाच्या माध्यमातून कॉम्रेड नवले यांना ट्रोल करून व्यक्त केली आहे.

नेत्यांच्या भूमिका….

मी प्राणाची बाजी लावणार, पण… आमदार डॉ.किरण लहामटे 

अकोले – संगमनेर जेव्हा जेव्हा एकत्र आले तेव्हा यश मिळालय – आमदार सत्यजित तांबे 

तुम्ही अकोले – संगमनेर जेव्हा जेव्हा एकत्र आले तेव्हा यश मिळालय – आमदार सत्यजित तांबे  आहात ना, रेल्वे येत नसेल तर फेका राजीनामे – बाजीराव दराडे 

सरकारची भूमिका वेगळी असेल तर सरकारच्या विरोधात जाणार – भाजप नेते जालिंदर वाकचौरे 

तालुका पेटलाय…. आता बनवाबनवी चालणार नाही, यापुढे कोणाच ऐकणार नाही – विनय सावंत

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!