अगस्ती सहकारी साखर कारखाना ; चेअरमन पदी गायकर तर व्हाईस चेअरमन पदी अशोक भांगरे यांची निवड
प्रतिनिधी —
अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी सीताराम गायकर तर व्हाईस चेअरमन पदी अशोकभांगरे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे .

अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात आज चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाची निवड निवडणूक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जी.जी.पुरी यांनी काम पाहिले.

यावेळी जेष्ठ संचालक रामनाथ बापू वाकचाैरे, कैलास वाकचाैरे, यमाजी लहामटे, मिनानाथ पांडे, मच्छिंद्र धुमाळ, अशोक देशमुख, विक्रम नवले, सुधीर शेळके, विकास शेटे, सचिन दराडे, मनोज देशमुख, पाटिलबा सावंत, प्रदिप हासे, पर्बतराव नाईकवाडी, अशोक आरोटे, बादशहा बोंबले, कैलास शेळके, सुलोचना नवले, शांताबाई वाकचाैरे उपस्थित होते.

राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याशी काल झालेल्या चर्चेनुसार आज मंगळवार दि. ४ ॲक्टोबर रोजी सकाळी अजित पवार यानी आमदार डॅा.किरण लहामटे यांना फोन करुन दिलेल्या नावानुसार हि निवड करण्यात आली आहे. व त्यानंतर सर्व संचालक सभागृहात जाऊन निवडणूक निर्णय अधिकारी जी.जी.पुरी यांचेकडे चेअरमन पदासाठी जेष्ठ नेते सीताराम गायकर व व्हाईस चेअरमन पदासाठी अशोक भांगरे यांनी अर्ज दाखल केले. फक्त दोघांचेच अर्ज दाखल झाल्याने चेअरमन पदी सीताराम गायकर व व्हाईस चेअरमन पदी अशोक भांगरे यांची निवड जाहिर करण्यात आली.

