थोरात कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ संपन्न

 प्रतिनिधी — 

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्श तत्वावर कारखान्याची वाटचाल सुरु आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सहकारासह तालुक्यात सातत्यपूर्ण विकासाची वाटचाल सुरु आहे. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला. ऊस हे शास्वत पिक असल्याने शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त ऊसाची लागवड करावी असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केले.

 

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखान्याचा सन २०२२-२३ या  गळित हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कांचन थोरात, दुर्गा तांबे, लक्ष्मणराव कुटे, इंद्रजित थोरात, संतोष हासे, आरती थोरात, अमित पंडित, गणपत सांगळे, माधव हासे, अजय फटांगरे, आर.एम.कातोरे, सुभाष सांगळे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदि उपस्थित होते.

कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात व त्यांच्या सुविद्य पत्नी आरती थोरात यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदिपन करण्यात आले. कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे व त्यांच्या सुविद्य पत्नी मनिषा हासे, रमेश गुंजाळ व त्यांच्या सुविद्य पत्नी ममता गुंजाळ, इंद्रजित खेमनर व त्यांच्या सुविद्य पत्नी सोनाली खेमनर, विनोद हासे व त्यांच्या सुविद्य पत्नी वैशाली हासे, अनिल काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी लता काळे यांच्या हस्ते विधीवत पुजा करण्यात आली.

 

याप्रसंगी बाबा ओहोळ म्हणाले कि, कारखाना ही तालुक्याची कामधेनु आहे. सहकाराबरोबर ग्रामीण विकास व आर्थिक चक्र तालुक्यात फिरत आहे. ही विकासाची संस्कृती आहे. काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुका सर्व क्षेत्रात अग्रगण्य आहे. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊसाची लागवड करावी.

कांचन थोरात म्हणाल्या कि, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे नाव असलेला कारखाना आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारात कायम लौकिकास्पद राहिला असून या कारखान्याने तालुक्याच्या विकासात कायम मोठे योगदान दिले.

कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले कि, यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस आहे.यावर्षी कार्यक्षेत्रात ६ लाख टन ऊसाची निर्मिती होणार आहे. तर बाहेरील ऊस उत्पादकांचा आपल्या कारखान्यावर विश्‍वास असल्याने बाहेरील ऊस आणून १३ लाख टन ऊस गाळप करण्याचे उदिष्ट कारखान्याने ठेवले आहे. कारखान्याचे सर्व ओव्हर ऑईलींगचे काम पुर्ण होत असून १० ऑक्टोबर पासून कारखाना सुरु करण्याचे उदिष्ट आहे. मागील गळित हंगाम यशस्वीपणे पार पडला असून कारखान्याचे सर्व रिझल्ट चांगले आले असल्याचे ही ते यावेळी म्हणाले.

याप्रसंगी संचालक चंद्रकांत कडलग, गणपत सांगळे, रोहिदास पवार, रमेश गुंजाळ, मिनानाथ वर्पे, इंद्रजित खेमनर, अभिजीत ढोले, भास्करराव आरोटे, भाऊसाहेब शिंदे, तुषार दिघे, विनोद हासे, अनिल काळे, संभाजी वाकचौरे, माणिक यादव, मंदा वाघ, शिवाजी जगताप, नानासाहेब दिघे, नानासाहेब गुंजाळ, शांताराम कढणे, दत्तु खुळे, किरण कानवडे, ब्रम्हदेव यादव, एन.बी.गडाख, ए.के.मुटकुळे आदि उपस्थित होते.

 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व सभासद,ऊस उत्पादक व शेतकरी,अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!