खासदार सुजय विखे यांची महसूल खात्यात ढवळाढवळ
….तर अधिकाऱ्याची एका दिवसात बदली करू
प्रतिनिधी —
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आहेत. मात्र खासदार सुजय विखे हे त्यांच्या खात्यात ढवळाढवळ करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्यातील महसूल विभाग भ्रष्टाचार मुक्त असून कोणत्याही अधिकाऱ्याने शेतकऱ्याकडे कामासाठी पैसे मागितले तर त्या अधिकाऱ्याची आपण एका दिवसात बदली करू असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान अधिकाऱ्याची बदली करण्याचा अधिकार यांना कोणी दिला असा उपस्थित सवाल उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यातील वयोवृद्ध व्यक्तींना शासकीय लाभ मिळण्यासाठी, गरिबांना रेशन काढण्यासाठी, शेतकऱ्यांना खाते फोड करण्यासाठी कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला पैसे देण्याची गरज नाही. पुढच्या सहा महिन्यात हे शासकीय अधिकारी तुमच्या दारात येतील आणि तुमची रखडलेले कामे पैसे पूर्ण करतील. कोणत्याही अधिकाऱ्याने पैसे मागितले तर माझ्याकडे या आपण त्या अधिकाऱ्याची एका दिवसात बदली करू असे वक्तव्य खासदार विखे यांनी केले आहे.

दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल मंत्री आहेत. मात्र खासदार सुजय विखे पाटील यांनी या पदाचा पदभार घेतला की काय अशी चर्चा नगर जिल्ह्यात जोर धरू लागली आहे. या आधीही खासदार विखे यांनी नगर येथे महसूल विभागासंदर्भात बऱ्याच विषयात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आज केलेल्या वक्तव्यावरून त्या चर्चेला अधिक बळकटी मिळाली आहे.
सौजन्य – दैनिक सामना

