दांडियाच्या तालावर थिरकल्या पद्मश्री राहिबाई पोपेरे आणि माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे !
लायन्स – इनरव्हील नवरात्र दांडिया महोत्सव !!
प्रतिनिधी —
दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतरचा पहिला नवरात्र उत्सव.. बुधवारची नवरात्र.. सायंकाळचा.. प्रचंड उत्साह, सकारात्मक ऊर्जेने आशावादी भविष्याची आस घेऊन मालपाणी लॉन्स येथे जमलेल्या असंख्य महिला… जणू काही नवदुर्गाच. .. आरोग्यदायी आणि समृद्ध जीवनासाठी विघ्नहर्ता व दुर्गा मातेचीआरती करून डिजेच्या संगीतावर दांडिया महोत्सव सुरू झाला…. एकच जल्लोष झाला आणि डीजेच्या त्या लयबद्ध तालावर बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे आणि संगमनेरच्या प्रथम नागरिक माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनासुद्धा थिरकण्याचा मोह आवरला नाही.
लायन्स इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डीजे दांडिया नाईट २०२२ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी पद्मश्री पुरस्कार प्राप्त बीजमाता राहीबाई पोपेरे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, इनरव्हील जिल्हा ३१३ उपाध्यक्षा रचना मालपाणी, लायन्स क्लबचे प्रेसिडेंट राजेश लाहोटी, इनरव्हील प्रेसिडेंट वृषाली कडलग, मयूर ज्वेलर्सचे संचालक महेश मयूर, वैशाली मयूर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी पद्मश्री राहीबाई पोपेरे म्हणाल्या की, भारतीय संस्कृतीमध्ये नवरात्र उत्सवाला प्रचंड महत्त्व आहे. स्री ही अबला नव्हे तर देवी दुर्गा मातेचे प्रतीक आहे. आणि दुर्गामाता ही शक्तीचे प्रतीक आहे. हीच शक्ती नवनिर्माण घडवू शकेल.

आपल्या भाषणात दुर्गा तांबे म्हणाल्या की, लायन्स व इनरव्हील क्लब यासारख्या सामाजिक संस्थांनी राबवलेले उपक्रम हे संगमनेरच्या सांस्कृतिक परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे.
डिजे नवरात्र दांडिया महोत्सवात लिटल स्टार, लिटल चॅम्प्स, अँगल ग्रुप ,स्वीट अंगल्स, सिक्रेट सुपरस्टार यांनी पारितोषिके पटकावली.

या निमित्ताने नवदुर्गांचा विशेष सन्मान करण्यात आला त्यात बेस्ट प्रशासकीय अधिकारी शिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे, बेस्ट होम मेकर कमलाबाई असावा, बेस्ट मेकअप आर्टिस्ट हर्षा खाडे, बेस्ट बिजनेस वुमन रूपाली गगड, बेस्ट कुक संगीता
मयूर, बेस्ट पोलीस ऑफिसर निकिता महाले, बेस्ट आर्किटेक्ट कोमल लाहोटी, बेस्ट एसटी कंडक्टर शिला वाकचौरे यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी लायन्स झोन चेअर पर्सन सुधीर डागा, सुमित भट्टड, समता पतसंस्थेच्या स्वाती कोयटे, संदीप जाजू , अमोल खटाटे, सचिन आवारी, अमोल देशमुख, रेखा तवरेज, विजय ताजने आदी उपस्थित होते.

नवरात्र दांडिया महोत्सव यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लबचे सेक्रेटरी विनायक कुलकर्णी, खजिनदार योगेश कोळपकर, इनरव्हील सेक्रेटरी ज्योती पलोड, खजिनदार सुनीता गाडे, प्रकल्प समिती प्रकल्प प्रमुख राखी करवा, सरला असावा, दांडिया महोत्सव समिती सदस्या कोमल लाहोटी, स्मिता मालानी, सुनिता पगडाल, नेहा सराफ, पूनम राजपाल, नेहा सराफ, धनश्री घोडेकर, वैशाली खैरनार, किर्ती करवा, कुशा कासट, पद्मा कलंत्री, डॉ. श्रद्धा वाणी, ज्योती कासट, विशाखा गाडे, योगिणी कलंत्री, अमोल खटाटे, कुशावर्त कासट आदींनी महोत्सव यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.


