‘एकविरा’ फाउंडेशनचे संगमनेरात मंगळवारी भव्य दांडिया स्पर्धेचे आयोजन !
प्रतिनिधी —
नवरात्र उत्सवानिमित्त तालुक्यातील युवती व महिलांसाठी एकविरा फाउंडेशनच्या वतीने मंगळवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत यशोधन कार्यालयाजवळील प्रांगणात मोफत भव्य दांडीया स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.जयश्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

नवरात्र उत्सवातील दांडिया स्पर्धा हा कार्यक्रम संगमनेरच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारा आहे. मागील पाच वर्षापासून एकविरा फाउंडेशनच्या वतीने मराठी चित्रपट सृष्टीतील सिने अभिनेत्रींच्या उपस्थितीत भव्य दिव्य दांडिया स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत.

यावर्षी मंगळवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी सहा ते दहा या वेळेत या दांडिया स्पर्धा होणार आहे. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या कांचन थोरात, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, शरयू देशमुख यांसह शहरातील विविध महिला उपस्थित राहणार आहेत.

या दांडिया स्पर्धांसाठी भव्य दिव्य मैदान, आकर्षक स्टेज व्यवस्था, साऊंड सिस्टिम, विद्युत रोषणाई, प्रेक्षक गॅलरी, सुंदर बैठक व्यवस्था, सामुहिक गायन व नृत्य व्यवस्था असणार आहे. या दांडिया स्पर्धांमधील समूहांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी या मोफत दांडीया स्पर्धेमध्ये तालुक्यातील व शहरातील जास्तीत जास्त महिला व युवतींनी सहभाग घ्यावा असे आवाहन एकविरा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

