इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीडिया असोसिएशनच्या अकोले तालुका अध्यक्षपदी आवारी तर देशमुख सेक्रेटरी
प्रतिनिधी —
महाराष्ट्र राज्य डिजिटल इलेक्ट्रॉनिक मिडिया असोसिएशनच्या अकोले तालुका अध्यक्षपदी गणेश रामदास आवारी तर सेक्रेटरी पदी प्रशांत संपतराव देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. जेष्ठ पत्रकार श्रीनिवास रेणुकदास यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत सन २०२२ –२३ या वर्षा करिता ही निवड करण्यात आली.

अकोले येथील शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य डिजिटल इलेक्ट्रॉनिक मिडिया असोसिएशन या संघटनेची स्थापना करण्यात आली. युट्युब, फेसबुक, इंस्टाग्राम, न्यूज पोर्टल, वेबसाईट आदि डिजिटल समाज माध्यमांच्या माध्यमातून काम करणाऱ्या अकोले तालुक्यातील डिजिटल मीडिया पत्रकारांची संघटना असावी असा प्रस्ताव पुढे आला.

त्यानंतर यावर साधक बाधक चर्चा होऊन समाज माध्यमात कांम करणाऱ्या प्रतिनिधींच्या प्रश्नावर सामुहिक पणे काम करता यावे, कायदेशीर मान्यता, स्वतंत्र कायदा व्हावा, या क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्या तरुणांना प्रशिक्षण देणे आदि विषयावर ही संघटना काम करेल.

आज झालेल्या या बैठकीत पदाधिकारी निवड करण्यात आली. अध्यक्ष गणेश आवारी यांच्या नावाची सुचना रेनुकदास यांनी आणली त्यास आबासाहेब मंडलिक यांनी अनुमोदन दिले. तर सेक्रेटरी देशमुख यांच्या नावाची सुचना संदीप दातखिळे यानी आणली त्यास नरेंद देशमुख यानी अनुमोदन दिले. यानंतर नुतन पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यकारिणी मध्ये उपाध्यक्षपदी संदिप दातखिळे, खजिनदारपदी नरेंद्र देशमुख यांची निवड करण्यात आली. यावेळी सदस्य म्हणून आबासाहेब मंडलिक, आण्णासाहेब वाकचौरे यांची निवड यावेळी करण्यात आली.

