अगस्ती कारखाना निवडणूक पिचड पिता पुत्रांचा दारुण पराभव !
भाजपची बोलती बंद !!
प्रतिनिधी —
अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीचा निकाल अत्यंत धक्कादायक रित्या लागला असून गेल्या २८ वर्षांपासून एक हाती सत्ता असलेल्य माजी मंत्री मधुकर पिचड व त्यांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड यांचा दारुण पराभव झालेला आहे. शेतकरी विकास मंडळाचे नेते, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री मधुकर पिचड याचा अनुसूचित जाती जमाती मतदार संघात त्यांचे पारंपरिक विरोधक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे यांनी पराभूत केले आहे. तर पिचड यांचे सुपुत्र माजी आमदार वैभव पिचड यांचा इंदोरी सर्वसाधारण गटातून तारुण पराभव झाला आहे.

२८ वर्ष अगस्ती साखर कारखान्याचे चेअरमनपद भूषविलेले माजी मंत्री मधुकर पिचड यांना सहकारातील निवडणुकीत प्रथमच कारखान्याच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री पिचड व अशोक भांगरे यांच्यातील लढतीत पिचड यांनी विजय मिळविला होता. मात्र अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत हे चित्र उलटे झाले आहे. शेतकरी समृद्धी मंडळ व शेतकरी विकास मंडळात ही निवडणूक झाली होती. त्यामध्ये प्रथम पासूनच शेतकरी समृद्धी मंडळाचे उमेदवार विजयी होत गेले.

अनुसूचित जाती जमाती मतदार संघातील उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे-
अशोक भांगरे (विजयी) – ४२१४ मते – मधुकर पिचड (पराभूत)- २८५० मते

तर
इंदोरी सर्वसाधारण उत्पादक गटात माजी आमदार वैभव पिचड यांच्यासह कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रकाश नवले, माजी संचालक भाऊसाहेब खरात व अपक्ष उमेदवार प्रकाश हासे यांचा पराभव झाला आहे. शेतकरी समृद्धी मंडळाचे उमेदवार विद्यमान संचालक अशोक देशमुख, पाटीलबा सावंत व प्रदीप हासे यांचा विजय झाला आहे. अधिकृत जाहीर झालेल्या सोसायटी मतदार संघाच्या निकालात कारखान्याचे उपाध्यक्ष व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, अकोले गटात जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कारखाण्याचे माजी उपाध्यक्ष कैलास वाकचौरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख व विद्यमान संचालक मच्छिन्नद्र धुमाळ, विक्रम नवले यांनी विजयी सलामी दिली आहे. त्याच निकालाचा ट्रेंड पुढील इंदोरी गटात दिसून आला आहे. शेतकरी विकास मंडळाचे नेते माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांना हा मोठा धक्का समजला जात आहे.

माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे सुपुत्र माजी आमदार वैभव पिचड व भाजप यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळ आणि सिताराम गायकर, आमदार डॉ. किरण लहमटे आणि अशोक भांगरे व इतर नेते मंडळी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी समृद्धी मंडळ यांच्यामध्ये ही निवडणूक झाली यात समृद्धी मंडळाने विकास मंडळाचा दारुण पराभव केला आहे.

शेतकरी समृद्धी मंडळाचे इतर विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे –
अशोक भांगरे, सिताराम गायकर,अशोक झुंबरराव आरोटे, पर्बत नाईकवाडी, विकास शेटे, कैलास शेळके, मनोज देशमुख, यमाजी लहामटे (आमदार किरण लहामटे यांचे वडील), रामनाथ बापू वाकचौरे, बादशहा दत्तू बोंबले, सुधीर कारभारी शेळके, सुलोचना अशोक नवले, शांताबाई दगडू वाकचौरे, मीनानाथ पांडे, सचिन दराडे, अशोक देशमुख, पाटीलबा सावंत, प्रदिप हासे, कैलास वाकचौरे, मच्छिंद्र धुमाळ, विक्रम नवले.

